Breaking
गुन्हेगारीमहाराष्ट्र

लासलगाव येथे चोरीच्या घटनांमध्ये वाढ लासलगावकर चिंतेत

तीन महिन्यात बँक ऑफ बडोदा ते ऐश्वर्या लॉज परिसरात चोरांचा सुळसुळाट 

1 0 9 0 9 5

न्यायभूमी 

लासलगाव दि.२१ जुलै प्रतिनिधी कैलास उपाध्ये 

गेल्या तीन महिन्यात लासलगाव परिसरात चोऱ्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे. व पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.

स्टेशन रोड परिसरात धाडीवाल जनरल स्टोअर्स तसेच ऐश्वर्या लॉज मध्येही चोरांचे सीसीटीव्ही फुटेज असतानाही चोर का पकडले जात नाही असे शंका लासलगावकर करत आहे.

लासलगाव येथील गणपती मंदिर,जैन मंदिर,दत्त मंदिर,स्वामी समर्थ केंद्र शास्त्रीनगर तसेच डॉक्टर पवार हॉस्पिटल येथील स्वामी समर्थ केंद्र येथेही मोठ्या प्रमाणात चांदीच्या भांड्यांची चोरी झाली आहे.

काल रात्री दीड वाजेच्या सुमारास स्टेशन रोड येथील सायेशा ट्रेडिंग कंपनी ब्रम्हेचा यांच्या कांदा गोडाऊन मधील ऑफिस फोडल्याचं प्रकार समोर आला आहे.चोरीच्या सीसीटीव्ही फुटेज व माहिती पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे.

 लासलगाव पोलीस स्टेशन कडून करण्यात आलेल्या उपायोजना

वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची उपाययोजना:मंदिरांमध्ये आणि दुकानांमध्ये वाढत्या चोऱ्यांच्या घटना लक्षात घेता, लासलगाव पोलिसांनी सुरक्षेसाठी कडक पावले उचलली आहेत.

लासलगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कोते यांनी मंदिरांमध्ये तात्काळ सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे बसवण्याचे आवाहन केले आहे.

देवाचे सोन्या-चांदीचे दागिने व मौल्यवान वस्तू रात्री सुरक्षित ठिकाणी किंवा बँकेच्या लॉकरमध्ये ठेवण्याची सूचना मंदिर व्यवस्थापनाला करण्यात आली आहे.

ग्रामीण भागात सुरक्षेसाठी व रात्रीच्या गस्तीसाठी ‘ग्रामरक्षक दला’ची स्थापनाही करण्यात येत आहे.

1.5/5 - (2 votes)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 0 9 0 9 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे