Breaking
आरोग्य व शिक्षण

काळखोडा जिल्हा परिषद शाळेत’जल्लोष कलागुणांचा’ वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न;ग्रामस्थांचा उदंड प्रतिसाद

न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 8 9 9 9 5

न्यायभूमी 

नासीक ( विचूर ) दि.२७ जानेवारी सुनील क्षिरसागर

काळखोडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गुरुवारी (दि. २३ जानेवारी) ‘जल्लोष कलागुणांचा – २०२६’ हा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्यातून आणि कलाविष्काराने उपस्थितांची मने जिंकली.

​कार्यक्रमाची सुरुवात विद्यादैवत सरस्वती मातेचे पूजन आणि दीप प्रज्वलनाने झाली.या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी देवराम शेळके होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरिभाऊ शेळके उपस्थित होते.

यावेळी सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक प्रभाकर राठोड सर यांनी केले,ज्यामध्ये त्यांनी शाळेच्या प्रगतीचा आणि उपक्रमांचा आढावा घेतला.

​यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली.विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर आणि विषयांवर बहारदार नृत्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

या सोहळ्यासाठी गावाचे सरपंच,उपसरपंच, पोलीस पाटील,सर्व सदस्य,तरुण वर्ग,महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे आणि शाळेच्या नियोजनाचे भरभरून कौतुक केले. विशेष म्हणजे, कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामस्थांच्या वतीने शाळेतील सर्व शिक्षकांचा शाल व श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला,ज्यामुळे शिक्षक व पालक यांच्यातील जिव्हाळा दिसून आला.

​कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन अरविंद राठोड यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आहेर सर,खापरे सर आणि उशीर मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाच्या अंती वैशाली वाकचौरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 9 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे