खडक माळेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत माझी शाळा – माझा अभियान उपक्रमांतर्गत माझी विद्यार्थी मेळावा
न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर
न्यायभूमी
खडक माळेगाव दि.२९ ऑक्टोंबर :– राजेंद्र जाधव
खडक माळेगाव ग्रुप ग्रामपंचायत च्या सहकार्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शासनाच्या माझी शाळा — माझा अभिमान या उपक्रमांतर्गत 1969 सालापासून तर आज पर्यंतच्या मराठी शाळेत शिकलेल्या सर्व वयोगटातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला.
अध्यक्षस्तानी सुकदेव रायते हे होते.दिपप्रजोलन श्री गवळी साहेब यांच्या हस्ते झाले.प्रसंगी याच शाळेत शिकलेले खडक माळेगावचे भूमिपुत्र माननीय शिवाजीराव आम्ले कृषी उपसंचालक ठाणे,माननीय श्री चंद्रकांत वामनराव गवळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक नाशिक, माननीय श्री कैलास शिंदे शिक्षण अधिकारी मराठा विद्या प्रसारक,श्री सुखदेव रायते सरचिटणीस नूतन विद्यालय,श्री अशोक शिंदे उद्योजक नाशिक, तसेच शासनाचे प्रतिनिधी श्री सुनील पाटील सहाय्यक गट विकास अधिकारी पंचायत समिती निफाड,गावचे प्रथम नागरिक सरपंच श्री जगदीश पवार,ग्रामविकास अधिकारी श्री संदीप पवार, उपसरपंच शांताराम रायते,दत्तात्रय रायते, सुभाष रायते,पंढरीनाथ रायते,सुरेश रायते,सुरेश शिंदे,रत्नाकर रायते,विकास रायते,माधव पाटीलबा रायते,भगीरथ रायते,विठ्ठल कान्हे, ज्ञानेश्वर शिंदे,बाबाजी रायते,योगेश रायते,राजेंद्र जाधव,तानाजी शिंदे,ज्ञानेश्वर नेहेरे,रवींद्र शिंदे, नारायण राजोळे अध्यक्ष शालेय समिती ग्रामस्थ माझी विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी प्रत्येकाने आपल्या शालेय जीवनातील प्रसंग सांगितला त्यावेळच्या शिक्षकांचा आवर्जून उल्लेख केला.
या निमित्ताने पुन्हा प्रत्येक वर्षी दिवाळीत सर्वांनी एकत्र येऊन पुन्हा भेटण्याचे ठरविले आपण आपल्या शाळेसाठी काही मदत करून सुविधा देऊ म्हणून प्रत्येकाने दरमहा ठराविक रक्कम शाळेला जमा करणे असेही गवळी साहेब यांनी सांगितले.
आनंददायी वातावरणाचा शेवट स्नेहभोजने भोजनाने करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश काका रायते यांनी केले.


