नॉटी किड्स प्री प्रायमरी स्कूल वार्षिक सांस्कृतिक सोहळा उत्साहात संपन्न
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज महाराष्ट्र
लासलगाव दि 25 फेब्रुवारी सुनील पोळ
रायते एज्युकेशन अँड सोशल सोसायटी नाशिक या संस्थेच्या नॉटी किड्स प्रि-प्रायमरी स्कूल लासलगाव येथे शालेय विद्यार्थ्यांचा वार्षिक गुणगौरव सोहळा पार पडला. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी

फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन , शिवजयंतीचा सोहळा , कथा नाट्यीकरण , कविता नृत्यासह सादरीकरण ,आणि पारंपारिक तसेच आधुनिक गीतांवर नृत्य अशा सर्व प्रकारचे आयोजन करण्यात आले होते… सर्व विद्यार्थ्यांनी वरील सर्व प्रकारांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन यश संपादन केले..
या कार्यक्रमाचे उद्घाटन मा.श्री शिवाअप्पा सुराशे (मा.सभापती प.स निफाड) यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून श्री सचिनजी होळकर (सरचिटणीस नाशिक जिल्हा काँगेस कमिटी) , श्री केशवराव जाधव (सा. कार्यकर्ते व ग्रामापालिका सदस्य टाकळी) श्री सुकदेव दादा रायते (उपाध्यक्ष- नुतन विद्या प्रसारक मंडळ) श्री सुरेश रायते (मा.चेअरमन खरेदी विक्री संघ लासलगाव), ॲड. श्री विजयराम रायते (नोटरी तसेच संचालक एल.डी.पी. बैक लासलगाव) , श्री. दत्ताकाका रायते (संचालक सरस्वती बँक ओझर) , सौ. अश्विनी जाधव (सरपंच- टाकळी ग्रामपालिका) श्री सुनिलजी पोळ (पत्रकार ,उदयोजक लासलगाव)
इ मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते सर्वोत्कृष्ठ विद्यार्थ्यांना पारितोषिके, मेडल्स व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले..
यामध्ये
१)फॅन्सी ड्रेस पारितोषिक विजेते
प्रथम- कु. ईश्वरी बाबाजी जगताप
द्वितीय- कु. हित आदर्शजी चोरडीया
तृतीय- कु. वरद हर्षद आहेर
२) 100% अटेंडन्स ऑफ द इयर अवार्ड –
कु. शिवाज्ञा बापुसाहेब रायते
३) बेस्ट ओरल परफॉरमन्स ऑफ द इयर अवॉर्ड –
कु. जयशे प्रमोद निकम
४) बेस्ट आय-क्यू ऑफ द इयर-
कु. शिवराज योगेश जगताप
५) बेस्ट सपोर्टीव पॅरेन्ट्स ऑफ इयर अवार्ड-
श्री. व सौ. मुजम्मील मनियार
तसेच
पोयम कौम्पिटीशन , आय क्यू टेस्ट , गुड नाईट पार्टी , रेड डे , यलो डे , पिंक डे , ब्लॅक अँड व्हाईट डे रिपब्लिक डे , इंडिपेंडन्स डे , तसेच विविध सण जसे पोळा ,आषाढी एकादशी ,गणपती उत्सव ,दसरा ,दिवाळी , मकर संक्रांती ,नाताळ इ सेलिब्रेशन मध्ये उत्कृष्ठ विद्यार्थ्यांना पारितोषिके व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले..
याप्रसंगी प्रमुख अतिथी श्री सचिनदादा होळकर यांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.
तसेच रायते एज्यू सोसायटी या संस्थेचे सचिव श्री बापुसाहेब रायते यांनी मान्यवरांचा सत्कार करून सर्वांचे आभार मानले..
या सोहळ्यासाठी प्राचार्या सौ. पल्लवी रायते , सौ.वैशाली जाधव , सौ सुजाता रायते सौ. भाग्यश्री खुडे मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले..



