क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त निमित्त नाटीकेसह विविध कार्यक्रमातून अभिवादन
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
सटाणा दि ०३ जानेवारी:
सटाणा येथील दोधेश्र्वर पब्लिक स्कूल येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. शांताराम गुंजाळ यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यांनतर शाळेच्या सर्व शिक्षकांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.
यावेळी प्रा. शांताराम गुंजाळ यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनपट उलगडून सांगताना त्यांचा संघर्ष आणि ज्योतिबा फुले यांनी त्यांना दिलेली साथ असे काही प्रसंग विद्यार्थ्यांना सांगीतले.
त्याचप्रमाणे अनुक्रमे इयत्ता चौथी व पाचवी च्या विद्यार्थिनी आरुषी सोनवणे, देवश्री पाटील यांनी सावित्रिमाईची वेशभूषा साकारून आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच इयत्ता आठवीची विद्यार्थिनी सायली बगडाणे हिने ही आपलं मनोगत व्यक्त केले.
त्यानंतर इयत्ता पाचवी च्या विद्यार्थिनी समृद्धी आहिरे, सुमेरा तांबोळी, जान्हवी बिरारी, राजवीर जाधव, ऋषिकेश ठाकरे यांनी शिक्षणाविषयी सावित्रीबाई फुले यांची धडपड आणि त्यांना समाजाकडून झालेला त्रास याबाबत नाटीका सादर केली.
यावेळी शाळेचे कार्यालयीन प्रमूख दादा खरे, शिक्षक दिपक पाटील, विनय वालिया, शिक्षिका माधुरी देवरे, मनीषा सोनवणे, जयश्री पवार, वर्षा जगताप, प्रतिभा खैरनार, अमृता जाधव, वृषाली खैरनार, प्राजक्ता सोंजे, रुपाली जाधव, विद्या पवार, वर्षा कापडणीस यांसह शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार राहुल येशी यांनी व्यक्त केले.