लासलगाव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरात मोफत आरोग्य तपासणी आणि हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
लासलगाव दि २६ डिसेंबर:
लासलगाव येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच विशेष संस्कार शिबिर जिल्हा परिषद शाळा, वाकी (खुर्द), तालुका चांदवड, जिल्हा नाशिक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे.
शिबिराच्या तिसऱ्या दिवशी राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि लासलगाव डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने शिबिरामध्ये आरोग्य तपासणी शिबिराच आयोजन करण्यात आले.
लासलगाव डॉक्टर असोसिएशनचे डॉक्टर कैलास पाटील, डॉक्टर अमित धांडे, डॉक्टर नितीन न्याहारकर, डॉक्टर ईश्वर वाकचौरे, डॉक्टर संगीता सुरसे इत्यादी उपस्थित होते तर शिबिराच्या चौथ्या दिवशी राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, तळेगाव रोही यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिरातील सर्व स्वयंसेवक विद्यार्थी आणि वाकी येथील जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी आणि हिमोग्लोबिन तपासणी चे आयोजन करण्यात आले.
संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदरावजी होळकर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनातून हे शिबिर घेण्यात आले. तळेगाव रोही येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रेणुका घोंगे त्यांच्या समवेत समुदाय आरोग्य अधिकारी जयदीप पांढरे, आशा चव्हाण, आशा सेविका संगीता निकम, पुष्पा सूर्यवंशी, नीता वाकचौरे, कालिदास सोनवणे, त्याचबरोबर काळखोडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे करण वाडकर, सतीश सोनवणे, दत्तात्रय लहरे इत्यादी स्टाफ उपस्थित होता.
या शिबिरातील सर्व स्वयंसेवकांचा आणि जिल्हा परिषद वाकी येथील शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा HB, RBC, Platlet, WBC, ECG, BP इत्यादी तपासणी करण्यात आल्या.
वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रेणुका घोंगे यांनी मुलींनी हिमोग्लोबिन नियंत्रित ठेवणेकरिता, सकस आहार व नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे व आहारात हिरव्या पालेभाज्या, सुकामेवा, खजूर, गुळ शेंगदाणे, शेवगा शेंगा, बिट, ब्रोकोली इत्यादींचा वापर करण्याचे आवाहन केले.
राष्ट्रीय सेवा योजना विभाग दर वर्षी अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करत असते. या शिबिरात महाविद्यालयाच्या 175 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.
जिल्हा परिषद शाळेतील 60 विद्यार्थ्यांनी हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचा लाभ घेतला.