ओझरच्या बोरस्ते विद्यालयात अवतरली विज्ञान नगरी प्रदर्शनात ८० प्रतिकृतींची मांडणी
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
ओझर: दि.२४ प्रतिनिधी / उत्तम गारे
तंत्रज्ञानाच्या युगात शोध व साहित्य निर्मितीसाठी विज्ञानाची गरज वाढत असल्याने विद्यार्थ्यांमधील कृतिशील व जिज्ञासा वृत्तीला चालना दिली पाहिजे यासाठी विज्ञान प्रदर्शनांची आवश्यकता असते असे प्रतिपादन मविप्रचे उपसभापती डी बी मोगल यांनी केले.
मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित येथील माधवराव बोरस्ते विद्यालयात शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शन उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
तसेच भागवत बाबा बोरस्ते यांनी विद्यार्थ्यांमधील शास्त्रज्ञ शोधायचा असेल तर विद्यार्थ्यांना आपण प्रेरणा व मार्गदर्शन केले पाहिजे, त्यासाठी विज्ञान प्रदर्शन हा एक स्तुत्य उपक्रम म्हणता येईल आणि तो या विद्यालयाने आयोजित केला त्याबद्दल त्यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे याप्रसंगी कौतुक केले. मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी विज्ञान प्रदर्शनाचा हेतू आणि महत्त्व प्रास्ताविकातून स्पष्ट केले.
व्यासपीठावर मविप्रचे उपसभापती डी बी मोगल, संचालक शिवाजी गडाख, भागवतबाबा बोरस्ते, महिला संचालिका शोभाताई बोरस्ते, शालेय समिती अध्यक्ष भास्करराव शिंदे, वसंतराव गवळी, कचेश्वर मोरे, निवृत्ती शेटे, लक्ष्मण चौधरी, प्रकाश पाटील, शालिग्राम कदम, प्रकाश शिवले, समीर मोरे, रत्नाकर कदम, मुख्याध्यापक सोपान वाटपाडे, उपमुख्याध्यापिका सुनीता नलावडे आदी उपस्थित होते.
प्रारंभी मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपसभापती डी बी मोगल होते.
मान्यवरांच्या हस्ते सरस्वती डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी गीतमंचाने विज्ञानगीत सादर केले. विज्ञान प्रदर्शन व रांगोळीचे उद्घाटन डी बी मोगल, शिवाजी गडाख, भागवतबाबा बोरस्ते, शोभाताई बोरस्ते, भास्करराव शिंदे यांच्या हस्ते हवेत हायड्रोजन फुगे सोडून झाले. प्रदर्शनामध्ये वैज्ञानिक व शैक्षणिक अशा ८० प्रतिकृती मांडण्यात आल्या होत्या.
प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी विशेषतः औषध फवारणी यंत्र नैसर्गिक शेती, पाण्यावरची शेती, इलेक्ट्रिसिटी जनरेटर, कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती, कचरा व्यवस्थापन, भूकंपअलार्म, घर्षण बलापासून विद्युत निर्मिती, हायड्रोलिक ब्लोअर, स्मार्ट सिटी स्मोक फिल्टर, मॅग्नेटिक इनोव्हेशन, प्लास्टिक रोड विथ मॅग्नेटिक रिपल्शन कार, थ्रीडी होलोग्रम, सूक्ष्मदर्शीका, डीजे गाडी, हँडपंप आणि वैज्ञानिक पोस्टर्स आदी प्रतिकृतींची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
वैज्ञानिक रांगोळीने विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. या विज्ञान प्रदर्शनाचा लाभ विद्यार्थी व अनेक पालकांनी घेतला. सदर उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याच्या प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केल्या.
विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी समिती प्रमुख नरेंद्र डेरले वनिता अहिरे आत्माराम शिंदे मोहिनी चौधरी बाबासाहेब गायकवाड संगीता शेटे राजश्री मोहन वनिता शिंदे संगीता भदाणे ज्योती पाटील सोनल माळोदे वैशाली कातकाडे सरिता घुमरे सुप्रिया भंडारे आदींसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक नरेंद्र डेरले, उज्वला कदम यांनी केले. आभार शिक्षक आत्माराम शिंदे यांनी मानले.