Breaking
ब्रेकिंग

नांदगाव येथील पंडित प्रदीप मिश्रा याच्या वाणीतून सुरू असलेली शिवमहापुरणाची उत्साहात सांगता

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 1 5 5 8 7

न्यायभूमी न्यूज 

नांदगाव दि ०४ ऑक्टोंबर

नांदगाव येथील पंडित प्रदीप मिश्रा याच्या वाणीतून सुरू असलेली शिवमहापुरणाची उत्साहात सांगता अगले साल कथा होनी चाहिये क्या.? हाँ….. जरा जोरसे बोलिये…. हाँ…. ठीक है.! तो फिरसे सुहास अण्णांजी कांदे जी को ही गद्दी पर बिठाना होगा.! अगर आपने ऐसे किया तो फिर मै अगले साल मेरी कथा नांदगाव क्षेत्र में करुंगा.! असे स्पष्ट अभिवचन आंतरराष्ट्रीय शिव महापुराण कथाकार पंडीत प्रदीप मिश्रा यांनी नांदगाव मतदार संघातील हिसवळ शिवारातील महादेव नगरीत केले.

आमदार सुहास कांदे व सौ. अंजुमताई कांदे यांच्या सहयोगातून गेल्या सात दिवसापासून महामार्ग क्रमांक ७५३ जे वर हिसवळ शिवारात आंतराष्ट्रीय शिव महापुराण कथाकार पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या अमोघ वाणीतून शिवकथा सुरु होती.तिचा आज अलोट गर्दीच्या साक्षीने समारोप झाला.

या शिव महापुराण कथेचे यजमान आमदार कांदे व सौ. कांदे यांना कथेचा शेवट करताना भरून आले, अगदी तीच गत पं. मिश्रा यांची झाली होती. अन भाविक तर मुक्तपणे अश्रूना वाट मोकळी करून देत होते.

 गेल्या सात दिवसात या सर्वांचा एकप्रकारे ऋणानुबंध निर्माण झाला होता. पं. प्रदीप मिश्रा यांना अपेक्षित असलेली वातावरण निर्मिती आमदार सुहास कांदे यांनी फरहान दादा व अन्य सर्व शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, अन शासकीय अधिकारी, कर्मचारी मग त्यात पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक (नांदगाव, मनमाड ), प्रांतधिकारी, तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम अभियंता, राज्य परिवहन विभाग, वन विभाग, आरोग्य विभाग, दोन्ही नगरपरिषद प्रशासन, सामाजिक कार्यकर्ते, खाजगी सुरक्षा विभाग,पंचायत समिती प्रशासन, गृह रक्षक दल, अन्न औषधी प्रतिबंधक विभाग हे सर्व अन्य महत्वाचे विभाग या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांनातून सात दिवसाचा हा शिव महापुराण कथेचा महाकुंभ यशस्वी पार पडला.

गेल्या सात दिवसात कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. अगदी छोटा सुद्धा अपघात झाल्याचे दिसून आले नाही.

आमदार सुहास कांदे यांनी आपल्या पदाधिकारी, शिवसैनिक व प्रशासनाच्या मदतीने हे शिवधनुष्य लीलया पेलले. आणि ही गोष्ट खुद्द आजपर्यंत जग व देशभरात कथा केलेल्या पं. प्रदीप मिश्रा यांनी आपल्या जाहीर कथेतून वारंवार उदघृत केली. त्यामुळे या नियोजनाचे कौतुक साहजिकच होत आहे.

आजमितीस महिला सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य दिले जात असल्याच्या काळात या ठिकाणी एकूण उपस्थितीच्या टक्केवारीत महिला भाविकांची संख्या ९० टक्के होती. मात्र आमदार सुहास कांदे यांच्या काटेकोर पणे केलेल्या सूक्ष्म नियोजनाने महिला भाविकांमध्ये प्रथमच आमदाराबद्दल कौतुकाचे शब्द बोलले जात होते.

महिला भाविकांच्या सुरक्षेबाबत आ. कांदे यांनी प्रशासनाला ज्या कडक सूचना केल्या होत्या, त्याचे फलित कथेच्या यशस्वी नियोजनानंतर दिसून आले.

 गेल्या सात दिवसात पं.प्रदीप मिश्रा यांनी आपल्या प्रत्येक प्रवचनातून आमदार सुहास कांदे, व सौ. अंजुमताई यांच्या मतदार संघात सुरु असलेल्या कामांची ही कथा सुरु झाल्यापासून ते आजच्या समारोप कथेपर्यंत मुक्तपणे स्तुती केली…

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 5 5 8 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे