येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्षपदाची बिनविरोध निवड
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
येवला दि ०६ ऑक्टोंबर
पिंपळगाव लेप येथील प्राथमिक शाळेच्या व्यवस्थापन समितीची पुनर्गठण प्रक्रिया नुकतीच पार पडली होती.
या अनुषंगाने शनिवार दिनांक 5 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड करण्यासाठी मुख्याध्यापिका श्रीमती कल्पना बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी सरपंच विनोद अहिरे यांच्या उपस्थितीत शिक्षकांनी बैठक घेतली होती.
या बैठकीत अध्यक्षपदी किरण विठ्ठल गागरे,तर उपाध्यक्षपदी सीमा दीपक ढोकळे यांची खेळीमेळीच्या वातावरणात सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी शाळेतील शिक्षक संतोष गायकवाड व दगुजी सोनवणे यांनी शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले आहे.
याप्रसंगी शिक्षक योगेश देशमुख,शितल सानप,अनिल दौंडे,योगिता पोटे,भारत पगार तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य सुनील दुनबळे,नंदा दुनबळे, रेवणनाथ गोधडे,वैशाली सोनवणे,रोहिणी गोधडे,केदु काळे,रूपाली दाते,सुनील पोटे आदी उपस्थित होते.