न्यायभूमी न्यूज
नांदगाव दि०४ ऑक्टोंबर
घट स्थापना दिनाच्या निमित्ताने केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला.केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. या भाषेत बरोबर बंगाली, प्राकृत, आसामी,पाली आणि मराठी या पाच भाषांना केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिला. अनेक वर्षांपासून असलेल्या या मागणीला आज न्याय मिळाला.
मराठी भाषिकांचा हा ऐतिहासिक दिवस आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारचे आभार मानले. ते म्हणाले एका लढ्याला यश मिळाल्याची भावना व्यक्त केली.
तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील बारा कोटी जनतेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच सांस्कृतिक खात्याचे मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांचेही आभार मानले.
भाषेला अभिजात दर्जा मिळण्याचे निकष काय?
अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी ही भाषा किमान दीड ते दोन हजार वर्ष प्राचीन असावी.
त्या भाषेतील समृद्ध ग्रंथ व अन्य साहित्य परंपरा असावी. ते मूळ त्याच भाषेतील लिहिलेले असावे अनुवादित नसावी. भाषेचा प्रवास अखंडित असावा आणि प्राचीन व सध्याच्या भाषेतील नाते सुस्पष्ट असावे.
अशा सर्वसाधारण अटी आहेत एखाद्या भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबत राज्य सरकारकडून प्रस्ताव आल्यावर साहित्य अकादमी कडून पुराव्यांची छाननी होते.
त्रुटींची पूर्तता झाल्यावर पुरावे योग्य असल्यास केंद्रीय सांस्कृतिक खात्याकडे शिफारस केली जाते व मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव सादर केला जातो मराठी भाषेने सर्व निकष पूर्ण केले आहेत.