न्यायभूमी न्यूज
निफाड दि ०४ ऑक्टोंबर (वार्ताहर) :- देविदास निकम
राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वाहतूक विभागाच्या निफाड तालुकाध्यक्ष पदी पिंपळसचे राष्ट्रवादीचे निष्ठावान कार्यकर्ते किरण प्रकाश सुरवाडे यांची नियुक्ती करण्यात आली.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेबांच्या निर्देशाने वाहतूक विभागाचे प्रदेशाध्यक्ष आ.मिलिंद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, शहराध्यक्ष गजानन शेलार, वाहतूक विभागाचे जिल्हाध्यक्ष संजय मनोहर कातकाडे, शहराध्यक्ष संतोष जगताप यांच्या उपस्थितीत त्यांना नुकतेच नियुक्तीपत्र देण्यात आले.
शहराध्यक्ष गजानन नाना शेलार यांनी किरण सुरवाडे यांना वाहतूक विभागाचे निफाड तालुकाध्यक्षपदी नियुक्तीपत्र देत अभिनंदन केले.
यावेळी धनंजय पुरस्कार, सुमित पाटोळे, शाम माळी, वैभव सोनवणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
किरण सुरवाडे यांचे नियुक्ती बद्दल दिंडोरीचे खासदार भास्करराव भगरे सर, मा.आमदार अनिल (आण्णा) कदम, खंडू बोडके पाटील, राजू बोरगुडे, भूषण शिंदे, विष्णूपंत मत्सागर, छोटू साळे यांनी अभिनंदन केले आहे.