परभणी येथे संविधानाच्या पुस्तकाची विटंबनेच्या निषेधार्थ दिले निवेदन
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
विंचूर : दि २२ डिसेंबर सुनील क्षिरसागर
परभणी येथे झालेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे संविधानाच्या पुस्तकाची एका विकृत समाजकंटकाकडून झालेल्या विटंबनेचा निषेध म्हणून शांततेच्या मार्गाने सदर घटनेचा निषेध विंचूर येथील सिद्धार्थ मित्र मंडळ व माता रमाबाई महिला मंडळ तसेच विंचुर ग्रामस्थांच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला. व सदर आरोपीला कठोर शिक्षा व्हावी.
हीच प्रशासनाला लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांना विंचूर पोलीस चौकीत निवेदन देऊन विनंती करण्यात आली.
यावेळी निवेदन देताना सीमा निकाळे, कविता रणखांबे, मनिषा हरळे, सुनिता साळवे, ज्योती निकाळे, रत्ना निकाळे, मनिषा रुपवते, उदय रणखोबे, राजाभाऊ दरेकर, सरपंच सचिन दादा दरेकर, गंगाधर रणखांबे, कैलास निकाळे, कैलास बुरसळ, शिवा विंचुरकर, बाविस्कर व आदी ग्रामस्थ उपस्थित होते.