न्यायभूमी न्यूज
नाशिक दि ११ नोव्हेंबर
विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार चालू असतानाच मतदान जस्तीत जास्त प्रमाणात होऊन लोकशाही कष्या प्रकारे बळकट होईल.
योग्य उमेदवार हा कश्या प्रकारे निवडला जाईल. यासाठी मतदानाची टक्केवारी जास्तीत जास्त वाढण्यासाठी अनेक सामजिक संघटना , प्रशासन यांच्या मार्फत जनजागृती रॅली,पथनाट्य,परिपत्रक या माध्यमातून प्रबोधन करत आहे.
याचाच एक भाग म्हणून सकल मराठा परीवार या सामजिक संघटनेकडून विविध ठिकाणी प्रबोधन करण्यात येत आहे.
संघटनेच्या माध्यमातून शाळेच्या विद्यार्थी याना सोबत घेत विडिओ च्या माध्यमातून पोस्टर द्वारे अनेक संदेश देण्याचे काम संघटना करत आहे.
यात तुमचे भविष्य घडवा, आजच मतदान करा. लोकशाही ची ताकत तुमच्या मातात आहे. सशेक्त राष्ट्रासाठी मतदान करा.
लोकशाही तुमच्यापासून सुरू होते.तुमचे मत तुमचा आवाज यासारखे अनेक जनजागृती मेसेज देण्याचे काम करत आहे . प्रत्येक मतदाराने २० नोव्हेंबर ला राज्यभरात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी आपला मतदानाचा हक्क बजावावा.असे सांगण्यात येत आहे.
यासाठी मनपा शाळा क्रमांक ४९ पंचक. येथील शाळेचे सहकार्य लाभले.
यासाठी सकल मराठा परिवाराचे खंडू आहेर,प्रकाश बोराडे,कल्पेश बोराडे,सागर सहाणे,शरद दवडे,योगेश वरखडे,शुभम आहेर,आनंद पाटील,विकास मेदगे,गौरव जाधव, व संपूर्ण सकल मराठा परीवार टीम सहभागी होती.