श्रीमंत पतसंसंस्थेच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक शितल वाजे व प्रभारी मुख्याध्यापक रामदास वाजे यांचा सत्कार
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
सिन्नर दि २३ सप्टेंबर प्रतिनिधी:-
डुबेरे येथील श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्था यांच्या वतीने डुबेरे येथील कन्या शितल त्रंबक वाजे हिची पीएसआय / पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याने तसेच येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापक पदी निवड झाल्याबद्दल रामदास वाजे यांचा सत्कार पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन नारायण शेठ वाजे यांच्या हस्ते करण्यात आला.
संघर्षातून मिळालेले यश हे अवर्णनीय असते. काम करत असताना कौटुंबिक समस्याचा विचार करू नका. यापुढे भविष्यात चांगले प्रामाणिकपणे काम करून गावाचे नाव उज्वल करावे असे आव्हान संस्थापक चेअरमन नारायण शेठ वाजे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्थेचे व्हा. चेअरमनअरुण शेठ वारुंगसे यांनी केले. यावेळी प्राध्यापक एकनाथ माळी, पोलीस उपनिरीक्षक शितल वाजे ,प्रभारी मुख्याध्यापक रामदास वाजे यांनी मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन संस्थेचे व्यवस्थापक अयुब शेख त्यांनी केले .आभार बबनराव वाजे यांनी मानले.
यावेळी संचालक काशिनाथ आप्पा वाजे,दामोदर कुंदे, उद्योजक बबनराव वाजे, गणेश वाजे, म्हसू पवार, पत्रकार सुनील जाधव, धनंजय रेवगडे ,कार्यकारी संचालक महेश कुटे, चेतन वाजे, सोमनाथ गिरी ,गौरी वाजे आदीसह कर्मचारी उपस्थित होते.