बाभूळगाव येथील एस एन डी अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन केंद्र मध्ये इंडक्शन प्रोग्रॅम उत्साहात
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
येवला दि २५ सप्टेंबर प्रतिनिधी पुष्पा पाटील
एस एन डी अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन केंद्राच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी विधार्थ्यांचा इंडक्शन प्रोग्रॅम संपन्न झाला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री अमोल दरेकर उपस्थित होते.यावेळी सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
श्री अमोल दरेकर म्हणाले कि शिक्षक पालक व विध्यार्थी शैक्षणिक विकास:विद्यार्थी, शिक्षक व पालक या तिघांच्या समन्वयातूनच शैक्षणिक विकास शक्य आहे.
यावेळी बोलताना डॉ यादव म्हणाले की ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे नोकरी व व्यवसायात यशस्वी व्हावे यासाठी आमचे सर्वतोपरो प्रयत्न असतात.
संचालक श्री रुपेश दराडे म्हणाले कि महाविद्यालयाचे विध्यार्थी जगभरात विविध बहुराष्ट्रीय कंपन्या मध्ये काम करत आहेत . महाविध्यालयच्या गुणवत्तावाढीसाठी सदैव तत्पर आहोत.
यावेळी प्राचार्य डॉ डी. एम यादव ,सिविल विभागप्रमुख डॉ.उबेद अन्सारी, मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ हरजीत पवार, रजिस्ट्रार प्रा. डी. पी. क्षीरसागर , कॉम्प्युटर विभागप्रमुख प्रा रमेश दौंड , इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागप्रमुख डॉ प्रकाश रोकडे इलेक्ट्रिकल विभागप्रमुख प्रा संदीप कोल्हे मेकॅट्रॉनिक्स विभागप्रमुख डॉ हर्षल राणे , कॉम्पुटर आणि इलेट्रॉनिक्स विभागप्रमुख प्रा गणेश ढाके प्रथमवर्ष विभागप्रमुख डॉ विद्या निकम, प्लेसमेंट अधिकारी डॉ पावन टापरे
प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. प्रा धनश्री मिसाळ यांनी आभार मानले
सूत्रसंचालन प्रा संतोष धरम यांनी केले.
संस्थेचे अध्यक्ष आमदार श्री.नरेंद्रभाऊ दराडे, आमदार श्री. किशोर भाऊ दराडे, सचिव श्री.लक्ष्मणभाऊ दराडे, व श्री.कुणालभाऊ दराडे यांनी शुभेच्छा दिल्या.