प्राथमिक आरोग्य केंद्र निमगाव वाकडा अंतर्गत जंत नाशक मोहीम प्रशिक्षण संपन्न
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
लासलगाव दि ०१ डिसेंबर
प्राथमिक आरोग्य केंद्र निमगाव वाकडा अंर्तगत राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा करणे बाबत प्रशिक्षण देण्यात आले.
नाशिक जिल्हा परीषद नाशिक आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम दि. ०४ डिसेंबर ते दि.१० डिसेबर २०२४ रोजी मॉप अप दिन साजरा करून अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
त्या अनुशंघाने प्रा.आ.केंद्र निमगाव वाकडा द्वारे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत असलेल्या गावातील सर्व शाळांचे शिक्षक प्रतिनिधी, अंगणवाडी कार्यकर्ती, आशा स्वयंसेविका, आशा गटप्रवर्तक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक व आरोग्य निरीक्षक उपस्थित होते.
यावेळी डॉ. अविनाश कैलास पाटील यांनी १ ते १९ वर्षे वयोगटातील बालकांना कृमीदोष मुक्त करण्याकरीता जास्तीत जास्त लाभार्थीना लाभ मिळावा म्हणून शाळेतील व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शंभर टक्के उपस्थीत राहण्याबद्दल आवाहन केले आहे.
कृमीदोष हा मातीतून प्रसारीत होणाऱ्या जंतापासून होतो. याचे प्रमुख कारण म्हणजे परीसर स्वच्छतेचा अभाव असणे हे आहे.
बालकांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जिवनाचा दर्जा उंचावणे या उद्देशाने “जंतनाशक मोहीम” राबविण्यात येते.
बालकांमधे आढळून येणारा जंतदोष हा साधारण वाटत असला तरी त्याचे वाईट परीणाम आरोग्यावर दिसून येतात. जंतामुळे बालकांना अमोनियाचा सर्वाधिक धोका उद्भवतो.
शिवाय आताड्यांवर सुज येणे, भूक मंदावणे, उलट्या, अतिसार, पोटदुखी आदी आजार बळावतात.
सदर बैठकीत आरोग्य निरीक्षक चंद्रभान धोंडे यांनी मोहीमचे उद्दीष्टे व प्रयोजन समजावून सांगत आरोग्य सेवक, आशा, व आशा सेविका, अंगणवाडी कार्यकर्त्या यांना जबाबदाऱ्या नेमून दिल्या व जंत नाशक मोहीमेला यशस्वी रित्या पाड पाडण्यासाठी प्रोत्साहन दिले.