Breaking
आरोग्य व शिक्षण

डुबेरे विद्यालयाचे विद्यार्थी देणार बंगलोर येथील इस्रो संस्थेला भेट- जिल्ह्यातील एकमेव शाळा

व्यक्ती संदेश भगवान वाजे यांच्या सहकार्यातून

0 9 0 0 0 1

न्यायभूमी न्यूज 

सिन्नर दि १६ नोव्हेंबर प्रतिनिधी:- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक कृष्णाजी भगत यांच्या मार्गदर्शनाखाली डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी बंगलोर येथील इस्रो या वैज्ञानिक संस्थेला भेट देणार आहे.

इस्रो या संस्थेला भेट देणारी जिल्ह्यातील पहिली एकमेव शाळा आहे.

         येथील दानशूर व्यक्ती व विद्यालयाचे माजी विद्यार्थी संदेश भगवान वाजे यांच्या दातृत्वातून ही वैज्ञानिक सहल संपन्न होणार आहे. विद्यालयातील १८ विद्यार्थी व ३ शिक्षक सहभागी होत आहे.

विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास वाजे, उपक्रमशील विज्ञान शिक्षक पी.आर.करपे व उपशिक्षिका भारती निखाडे या वैज्ञानिक सहलीत सहभागी होणार आहे.

त्यासाठी लागणारा अंदाजे ३ लाख रुपये खर्च हा येथील दानशूर व माजी विद्यार्थी संदेश भगवान वाजे हे करणार आहे.

यापूर्वी देखील पुणे येथील आयसर संस्थेला भेट येणारा खर्च संदेश वाजे यांनी केला आहे. बंगलोर येथील इस्रो ,पुणे येथील आयसर व मुंबई येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च( टी आय एफ आर ) या संस्थानां भेट देणारी डुबेरे येथील जिल्ह्यातील ही एकमेव शाळा आहे.

     येत्या १९ नोव्हेंबर रोजी विद्यार्थी व शिक्षक जाणार आहे,विद्यार्थ्यांना या वैज्ञानिक सहलीसाठी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक कृष्णाजी भगत यांनी शुभेच्छा व आशीर्वाद दिले आहे.

या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहेत.

        विद्यार्थ्यांना मविप्र संस्थेचे सरचिटणीस अँड. नितीनजी ठाकरे, तालुका संचालक कृष्णाजी भगत, संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉ.भास्कर ढोके, शालेय समितीचे अध्यक्ष नारायण शेठ वाजे, उच्च माध्यमिक समितीचे अध्यक्ष विठ्ठल तात्या वामने , शालेय समितीचे सदस्य अरुण वारुंगसे,शंकरराव वामने, सरपंच सागर वारुंगसे, शरद माळी ,अर्जुन वाजे ,अशोक गवळी ,काशिनाथ आप्पा वाजे ,भाऊ रखमा वारुंगसे,विजय दादा वाजे मोहन माळी ,आण्णासाहेब वारुंगसे ,बबनराव वाजे पालक- शिक्षक संघाचे उपाध्यक्ष माणिक वारुंगसे आदींसह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

3/5 - (2 votes)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 0 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे