छावा संघटनेचे विद्यार्थी आघाडी ता.अध्यक्ष सुनिल सिरसाट यांच्या नेत्रुत्वात विद्यार्थांचे एसटी प्रशासनास निवेदन
Nyaybhumi news
न्यायभूमी न्यूज
भोकरदन/ विशेष प्रतिनिधी
भोकरदन ते जाईचा देव ही वाकडी (कुकडी) मार्गे जाणारी सायंकाळची बससेवा बर्याच दिवसापासुन बंद असुन त्यामुळे विद्यार्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

या संदर्भात विद्यार्थांच्या वतीने आज अ.भा.छावा संघटनेचे विद्यार्थी आघाडी तालुका अध्यक्ष सुनिल सिरसाठ यांच्या नेत्रुत्वात संबंधीत बससेवा तात्काळ सुरु करण्यात यावी.
या मांगणीसाठी विद्यार्थांना घेऊन प्रशासनाशी बससेवा सुरु करण्यात यावी यासंदर्भात चर्चा करून प्रशासनास निवेदन देऊन ही बससेवा तात्काळ सुरु करावी नसता तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
यावेळी प्रशासनाने आगारप्रमूखास निवेदन हस्तांतरण करून बससेवा सुरू करण्या संदर्भात उपाययोजना करू असे आश्वासन दिले.
यावेळी छावा संघटनेचे विद्यार्थी आघाडी ता.अध्यक्ष सुनिल शिरसाट यांच्यासह विद्यार्थी दिपक बावणे,कृष्णा शिरसाट,गणेश सोनवणे,प्रदिप बोराडे,आकाश शिरसाट,देवानंद मिरगे,रोहीत चोरमारे,ज्ञानेश्वर शिरसाट,लहु लोखंडे,अभिषेक शिरसाट,पवन मुळे,मार्तंड वाघमारे,अभिषेक पाडळे,राहुल सुरडकर,धम्मपाल साळवे,सोमीनाथ शेळके,भरत सिरसाट,सौरव साळवे आदींसह विद्यार्थांची मोठ्या संख्येने उपस्थीती होती.



