Breaking
महाराष्ट्र

ग्रामपंचायत लासलगांवकडून प्लास्टिक विरोधी मोहीम, एकाच दिवसात २८ किलो प्लास्टिक जप्त,२२ हजार रुपयांचा दंड वसूल

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 9 2 0 9 7

न्यायभूमी न्यूज 

लासलगाव दि १७ मार्च मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर 

ग्रामपंचायत लासलगांव ने माझी वसुंधरा ५.० मध्ये सहभाग नोंदविलेला आहे. त्यामुळे लासलगांव ग्रामपंचायतीकडुन भूमी, अग्नी, वायु, जल आणि आकाश या पाच तत्वांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यात येत आहे. त्यामुळे या पाच तत्वांना घातक ठरणाऱ्या वस्तुंचा वापर करणाऱ्यांविरोधात शासन निर्णयाप्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे. 

 

 दिनांक १६ मार्च २०२ रोजी ग्रामपंचायत लासलगांवने सिंगलयुज प्लास्टिक व कागदी ग्लास, डिश, थर्मोकॉल विरोधी मोहीम राबविली. यावेळी विंचुर रोड, कोटमगांव रोड व आठवडे बाजारील व्यावसायिकांसह सुमारे २३० दुकांनांची तपासणी करण्यात आली.

या एकाच दिवसांत २८ किलो प्लास्टिक, कागदी ग्लास, डिश जमा करत सुमारे २२ हजारांचा दंड वसुल केला आहे. ही मोहीम अशीच सुरु राहणार असुन सोमवारपासून दुकाने व आस्थापनांना भेटी देऊन कारवाई केली जाणार असल्याची माहीती ग्रामपंचायत अधिकारी एल.जे.जंगम यांनी दिली.

या मोहीमेमध्ये माजी सरपंच तथा सदस्य अफजल शेख, ग्रामपंचायत अधिकारी एल.जे.जंगम, ग्रा.पं. कार्यालय प्रमुख बाबा गिते, ऋषिकेश वाघ, चेतन सानप, रुपेश पवार, मयुर राऊत, रोशन गायकर, मंगेश अहिरे, संतोष कोरे, रवि त्रिभुवन आदी कर्मचाऱ्यांच्या पथकाने कारवाई केली.

केंद्र व महाराष्ट्र शासनाने प्लास्टिक व थर्मोकॉल आणि कागदी ग्लास डिश व तत्सम वस्तुंचा वापर करण्यावर बंदी घातलेली आहे. त्यानुसार एकल वापराच्या म्हणजेच सिंगल युझ प्लास्टिक व कागदी वस्तू उत्पादन, वापर, वाहतूक, वितरण, घाऊक आणि किरकोळ विक्री आणि साठवणूक यावर बंदी घालण्यात आलेली आहे. 

लासलगांव सह पंचक्रोशीतील नागरिकांनी पर्यावरणाचे रक्षण करण्याकरिता महाराष्ट्र शासनाने अधिसूचित केल्याप्रमाणे प्रतिबंधित प्लास्टिक व कागदी वस्तूंचा वापर (उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक) करु नये.

कायद्याचे पालन करुन सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने करण्यात आली आहे. कागदी ग्लास, डिश, प्लास्टिक पिशवीच्या वापर झाल्यावर रस्त्यावर, गटारीमध्ये फेकल्या जातात. यामुळे ड्रेनेज लाइन प्लास्टिक तुंबत आहेत.

त्याचा परिणाम पर्यावरण आणि सांडपाणी निचऱ्यावर होत आहे. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक कॅरिबॅगच्या विरोधात मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. त्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. ५० मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीच्या कॅरिबॅग विकणाऱ्या दुकानदारांनी ग्रामपंचायतीकडे नोंदणी करणे आवश्यक आहे,

ग्रामपंचायतीने सुरु केलेल्या या उपक्रमाचे नागरीकांसह व्यापारी वर्गाने स्वागत केले आहे. यावेळी नागरीकांनी प्रतिक्रीया देतांना ग्रामपंचायत प्रशासनाने जनजागृती करण्याबरोबर कठोर दंडात्मक कारवाई करावी. मोठ्या व्यापारी संघटना आता प्लास्टिकबाबत सतर्क झाल्या असल्या तरी रस्त्यावरील विक्रेते, दैनिक व आठवडे बाजारामध्ये प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.

चहा, नाश्ता, पाणीपुरीच्या गाड्यांवर कागदी / प्लास्टिक ग्लास व डिश चा वापर मोठ्याप्रमाणावर वाढलेला असुन त्याचा वाढता वापर सर्वांसाठी घातक आहे. 

तसेच सण उत्सव या काळात प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे कचऱ्याचा प्रश्न निर्माण होतो. प्लास्टिक पिशव्या प्राणी खातात. ते पोटात गेल्याने त्यांच्या जीवास धोका निर्माण होतो. शहरात ड्रेनेज लाइन कागदी ग्लास, डिश आणि कॅरिबॅगमुळे तुंबतात. या सर्व बाबींचा विचार करता ग्रामपंचायतीने कायमस्वरुपी एक विशेष पथक तयार केले आहे.

यामुळे प्लास्टीक व कागदी ग्लास व डिश विरोधी मोहीम ही कायम कार्यरत असणार आहे. त्यामुळे व्यावसायीक व नागरीकांनी प्लास्टीक व कागदी ग्लास व डिशचा वापर करणे टाळावे. भविष्यात प्रतिबंधीत प्लास्टीक व कागदी ग्लास व डिश वापरणाऱ्या नागरीकांवरदेखील कारवाई करण्यात येणार आहे.

“गावामध्ये फिरणारी जनावरे नागरीकांनी प्लास्टिक पिशवीमध्ये टाकलेले अन्न खातात. या अन्नासोबत प्लास्टीकदेखील जनावरांच्या पोटात जाते. अन्नासोबत पोटात गेलेल्या प्लास्टीकमुळे अनेक गायींनी आपला जीव गमावलेला आहे.

तसेच बऱ्याच जनावरांवर शस्त्रक्रिया करून त्यांच्या पोटातून मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक काढल्याच्या घटना घडलेल्या आहे. त्यामुळे नागरीकांनी प्लास्टीक पिशव्यांमध्ये अन्न टाकुन इतरत्र टाकणे टाळावे.

तसेच चहा नाश्ता विक्री करणाऱ्या व्यावसायीकांनी कागदी ग्लास व डिशचा वापर करणे टाळणे गरजेचे आहे. – श्री.राजेंद्र जाधव, सामाजिक कार्यकर्ते लासलगांव.”

५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरिबॅग, कागदी ग्लास, डिश लासलगांव ग्रामपंचायत हद्दीमध्ये वापरता येणार नाही. वापरले तर तो गुन्हा आहे. या प्रकरणी कॅरिबॅग व कागदी ग्लास व डिश वापरणाऱ्या व्यापाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येणार आहे.

त्यासाठी आज दि. १६ मार्च २०२५ वार रविवार पासुन मोहीम राबविण्यास सुरुवात झालेली आहे. – सौ.योगिता योगेश पाटील, सरपंच, ग्रामपंचायत लासलगांव”

“ग्रामपंचायतीने माझी वसुंधरा ५ मध्ये सहभाग घेतलेला आहे. त्यामुळे वसुंधराची संवर्धन करण्याची जबाबादारी आपल्या सर्वांची आहे. एमुक एक संस्था किंवा शासनाची जबाबदारी म्हणुन हात झटकणे हे गैर आहे.

त्यामुळे सर्व नागरीकांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेवुन माझी वसंधरा या योजनेसाठी सर्वांनी सहभाग नोंदवून मोठ्या प्रमाणआवर झाडांची लागवड करा.

कागदी ग्लास व डिश, प्लास्टिक पिशविंचा वापर बंद करा. खरेदीसाठी बाजार पेठांमध्ये जातांना घरातुनच पिशवी घेवुन निघावे.

वसुंधरेची संवर्धन करावे आणि प्लास्टीक वापराला नाही म्हणावे. – श्री. राजाबाबा होळकर, पर्यावरणप्रेमी”

एकल वापर प्लास्टिक बॅग, थर्माकॉल पासुन बनविलेली उत्पादने, डिस्पोजेबल डिश, कप, प्लेटस्, फोर्क, बाउल, कंटनेर, द्रव साठवण्यासाठी पाऊच, उत्पादने लपेटण्यासाठी किंवा साठवण्यासाठी प्लास्टिक पॅकेजिंग, स्ट्रॉ इत्यादींचा वापर नागरीकांनी करणे टाळावे.

आपले लासलगांव स्वच्छ व सुंदर ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. ग्रामपंचातीने माझी वसुधंरा या शासनाच्या योजनेमध्ये सहभाग घेतलेला असल्याने भूमी, अग्नी, वायु, जल आणि आकाश या पाच तत्वांचे संरक्षण व संवर्धन करणे गरजेचे आहे.

त्यामुळे प्लास्टिकला नागरीकांनी नाही म्हणा… – एल.जे. जंगम, ग्रामपंचायत अधिकारी, लासलगांव” 

1/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 2 0 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे