Breaking
महाराष्ट्र

न्यायभूमी न्यूज या वृत्ताची दखल अंगणवाडी पोषण आहारातील मृत पक्षी प्रकरणाची झेडपी अधिकाऱ्यांकडून पाहणी

पंचनामा,नमुने प्रयोगशाळेत पाठविणार

1 1 9 9 9 1

न्यायभूमी

नाशिक ( लासलगाव ) दि.१९ जुलै कैलास उपाध्ये

देवगाव ता.निफाड बिट क्र.२ मधील इंदिरानगर अंगणवाडी केंद्रात वितरित करण्यात आलेल्या घरपोच पोषण आहाराच्या बंद पाकिटात मृत पक्षी आढळल्याच्या घटनेची दखल घेत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. 

      संबंधित अंगणवाडी केंद्रात जुलै – ऑगस्ट २०२६ या कालावधीतील पोषण आहाराचे वाटप करण्यात आले होते.लाभार्थी प्रिन्स सुखदेव माळी व गणेश सुखदेव माळी यांना दि.१४ जुलै रोजी आहाराचे पाकीट देण्यात आले होते.

दि.१८ जुलै रोजी सकाळी त्यांच्या मातोश्री पूजा माळी यांनी आहार तयार करण्यासाठी पाकीट उघडले असता,त्यामध्ये मृत पक्षी आढळून आला.याची माहिती मालक प्रशांत कुलकर्णी यांनी तत्काळ अंगणवाडी सेविकेस दिली.

       याबाबत न्यायभूमी न्यूज मध्ये वृत्त प्रकाशित होताच,आज रविवार दि.१९ जुलै रोजी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी तसेच महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.

माजी सरपंच विनोद जोशी,जिल्हा परिषदेचे उपमुख्य अधिकारी प्रताप पाटील,महिला व बालविकास अधिकारी कोंढार साहेब,माजी सरपंच वैशाली अडांगळे, प्रशांत कुलकर्णी, मनोहर बोचरे,राजेंद्र मेमाणे,लहानु मेमाणे, तुकाराम बोचरे,पूजा माळी,सुखदेव माळी या ग्रामस्थांच्या उपस्थितीत सदर पाकीटातील पोषण आहाराचा पंचनामा करण्यात आला असून उर्वरित पोषण आहाराचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्याचे निर्देश देण्यात आले.

सदर पोषण आहाराचे तूरडाळ-तांदूळ रिमिक्स पाकीट (बॅच क्रमांक एम.डी.के – बी ०२-०६ उत्पादन दि.११ जून २०२६ असल्याची नोंद करण्यात आली.

तसेच देवगावमधील सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये शिल्लक असलेल्या पोषण आहाराचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.

घटनेचा सविस्तर अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात येणार असून तपासणीनंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

1/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 1 9 9 9 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे