एस.एन.डी.इंग्लिश मीडियम स्कूल,बाभुळगाव येथे थोर स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य टिळक व चंद्रशेखर आझाद यांची जयंती उत्साहात साजरी

न्यायभूमी
बाभुळगाव दि.२४ जुलै पुष्पा पाटील
एस.एन.डी.इंग्लिश मीडियम स्कूल,बाभुळगाव येथे थोर स्वातंत्र्यसैनिक व राष्ट्रपुरुष लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.

लोकमान्य टिळकांनी स्वराज्याचा मंत्र दिला,तर चंद्रशेखर आझाद यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वोच्च बलिदान दिले.त्यांच्या कार्याचा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी परिचय करून देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व पुष्पहार अर्पण करून झाली. यानंतर विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक आणि चंद्रशेखर आझाद यांच्या जीवनकार्यावर भाषणे सादर केली.
देशभक्तिपर गीते, घोषवाक्ये तसेच प्रेरणादायी विचारांद्वारे विद्यार्थ्यांनी राष्ट्रप्रेमाची भावना व्यक्त केली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक श्री.कैलास मलिक सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना लोकमान्य टिळक यांचे “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” हे ब्रीदवाक्य तसेच चंद्रशेखर आझाद यांचे अदम्य धैर्य,देशप्रेम आणि त्याग यांचा आदर्श जीवनात अंगीकारण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी लाभलेले शाळेचे मुख्याध्यापक श्री.निलेश शिंदे सर यांनी देशप्रेम व समाजसेवा ही राष्ट्राला मजबूत बनविते असे प्रतिपादन केले.सदर प्रसंगी शाळेचे उपमुख्याध्यापक श्री.संदिप पाटील सर,तसेच श्री.बंड सर,सोनवणे सर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कोकाटे मॅडम,शिंदे मॅडम,अन्सारी मॅडम,वैभव सर,नितीन सर,वाघ सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी ओवी काळे,व कुमारी श्रद्धा हिरे या विद्यार्थिनींनी केले,तर कार्यक्रमास सर्व शिक्षकवृंद,कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला.हा जयंती सोहळा विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती,राष्ट्रनिष्ठा आणि सामाजिक जबाबदारीची भावना दृढ करणारा ठरला.



