लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयात आंतरशालेय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन उत्साहात
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
लासलगांव दि ०५ फेब्रुवारी सुनील पोळ
लोकनेते दत्ताजी पाटील प्रतिष्ठान स्मृती सोहळा वर्ष 29 वे यानिमित्त आयोजित आंतरशालेय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन टाकळी विंचूर येथील प्रगतशील शेतकरी श्री संजय आनंदराव काळे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी टाकळी विंचूर ग्रामपंचायत सदस्य राम प्रभाकर बोराडे व प्रमुख अतिथी म्हणून नितीन होळकर योगेश न्याहारकर प्रवीण निरगुडे नितीन शर्मा यावेळी कार्यक्रमाचे उदघाटन संजय काळे यांनी दीप प्रज्वलन प्रतिमापुजन करून केले.

यानंतर श्री राम बोराडे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
यानंतर खेळाडू परिचय होऊन स्पर्धेला सुरुवात झाली.
अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात स्पर्धा पार पडल्या यावेळी संस्थेच्या वतीने माननीय संजय भाऊ पाटील,सिताराम पाटील जगताप, प्रकाश गांगुर्डे, अण्णा मापारी,कैलासजी ठोंबरे मुख्याध्यापक सोनवणे सर सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
