अमली पदार्थांचे सेवन कराल तर विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात डॉ.बी.बी.अहिरे
न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर
न्यायभूमी न्यूज महाराष्ट्र
लासलगाव दि.१८ जानेवारी सहसंपादक सुनील पोळ
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे व कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,लासलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमाले अंतर्गत ‘अमली पदार्थांचा दुरुपयोग’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.बी. बी.अहिरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
आपल्या व्याख्यानात डॉ.अहिरे यांनी अमली पदार्थांचे विविध प्रकार,त्यांचा शारीरिक, मानसिक तसेच सामाजिक जीवनावर होणारा दुष्परिणाम याबाबत सविस्तर माहिती दिली.
अमली पदार्थांचे सेवन केल्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येते,असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.भुषण हिरे होते.त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांच्या आहारी न जाता आपला वेळ छंद, क्रीडा, वाचन यांसारख्या सकारात्मक उपक्रमांमध्ये घालवावा, असे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय डॉ.राजेश शंभरकर यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सृष्टी थोरात यांनी केले.कार्यक्रमास प्रा.संदीप ठाकरे यांचीही उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी आदरणीय गोविंदरावजी होळकर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आदिनाथ मोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.



