शेती निविष्ठा जी.एस.टी.मुक्तच असाव्यात:– कृषीतज्ञ काँग्रेस नेते सचिन होळकर
न्यायभूमी न्यूज
न्यायभूमी
लासलगाव दि ०४ सप्टेंबर निशिकांत पानसरे
नुकताच केंद्र सरकारने अनेक वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहे मात्र हे सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण आहे.
आपला देश कृषीप्रधान देश असून देशातील जास्तीत जास्त प्रवर्ग हा शेतीवर अवलंबून आहे, दिवसेंदिवस शेतीचा उत्पादन खर्च वाढत आहे विशेषतः शेतीच्या निविष्ठा या मोठ्या प्रमाणात महाग होत आहे त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
केंद्र सरकारने शेतीनिष्ठांवरील जीएसटी कर कमी करण्याचे आश्वासन दिलेले असले तरी शेतीच्या सर्व निविष्ठा या पूर्णपणे जीएसटी मुक्त करणे आवश्यक असल्याचे मत प्रसिद्ध कृषीतज्ञ, साहित्यिक तसेच नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस सचिन आत्माराम होळकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
सरकार गेल्या अनेक वर्षांपासून जीएसटी च्या माध्यमातून शेतकऱ्यांची तसेच सर्वसामान्य जनतेची पिळवणूक करत आहे सर्वसामान्य माणसांना लागणाऱ्या अनेक वस्तू तसेच सेवा यावरील जीएसटी कर हा अन्यायकारक आहे.
जागतिक दर्जाचा विचार केल्यास अत्यंत प्रगत देशात देखील इतका मोठा जीएसटी असत नाही मात्र भारत सरकारचा जीएसटी हा गब्बरसिंग टॅक्स आहे.
सर्वसामान्यांना महत्त्वाच्या असणाऱ्या सेवा आणि वस्तू यावरील जीएसटी अत्यंत कमी असावा, त्याचप्रमाणे शेतीच्या निविष्ठा जीएसटी मुक्त असाव्यात.

चैन आणि हौसेच्या वस्तूंवर अधिकचा जीएसटी असावा कारण या देशातील सर्वसामान्य जनता आणि शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात त्रस्त झाला आहे.
अशी घनाघाती टीका काँग्रेस नेते होळकर यांनी केंद्र सरकारवर केली..


