Breaking
कृषीवार्ता

महाराष्ट्रातील कृषीसेवा केंद्र चालकांच्या मागण्या योग्य:-काँग्रेस नेते,कृषीतज्ञ सचिन होळकर

न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 9 1 4 9 4

न्यायभूमी 

 लासलगाव दिनांक २८एप्रिल निशिकांत पानसरे 

गेल्या 27 एप्रिल पासून विविध मागण्यांसाठी महाराष्ट्रातील 85000 कृषी सेवा केंद्रांचा बेमुदत संप सुरू आहे.या संपाचा फटका महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसणार आहे.

सध्या विविध पिकांसाठी विविध निविष्ठांची आणि खतांची गरज आहे या काळात निविष्ठा न मिळाल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते.

शासनाच्या चुकीच्या धोरणांचा कृषी सेवा केंद्र चालकांना त्रास होतो.निविष्ठाबाबत येणाऱ्या तक्रारीमध्ये उत्पादक कंपनी पेक्षा कृषी सेवा केंद्र संचालकांवर गुन्हे दाखल होतात आणि त्यांना मानसिक त्रास आणि पैशाचा अपव्यय होतो.

या बाबी सत्य आहेत.खतांचे लिंकिंग बंद करायचे असल्यास ते खत उत्पादक कंपनीकडून झाले पाहिजे लिंकिंग साठी विक्रेतांना दोषी धरणे योग्य नाही.

एखादा विक्रेता नकली माल विकत असेल तर त्यावर कार्यवाही झाली पाहिजे मात्र कंपनीच्या उत्पादित मालाची खात्री विक्रेता देऊ शकत नाही.

कृषी सेवा केंद्र संचालकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची आवश्यकता आहे. निविष्ठांवर छापलेल्या किमती ह्या विक्री किमतीपेक्षा जास्त असल्याने शेतकऱ्यांना संभ्रम निर्माण होतो यासाठी छापील किमतीवर बंधने असणे आवश्यक आहे.

अनेक ठिकाणी परवानगी न घेता घरगुती स्वरूपात औषधे विकण्याचे काम सुरू आहे त्यावर बंदी घातली पाहिजे त्यातून बऱ्याचदा शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते आणि सरकारचा महसूल बुडतो.

कृषीसेवा केंद्रात रासायनिक खते दुकानापर्यंत कमाल किरकोळ मूल्यावर (MRP) मिळायला पाहिजे.

या व इतर सर्व मागण्या राज्य सरकारने तात्काळ पूर्ण करून देणे आवश्यक आहे असे मत प्रसिद्ध कृषीतज्ञ तसेच नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस सचिन आत्माराम होळकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

याबाबत कृषिमंत्र्यांना ईमेलद्वारे निवेदन पाठवले आहे लवकच कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन या समस्या मांडणार असल्याचे होळकर यांनी सांगितले..

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 1 4 9 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे