खरीपातील अतिवृष्टीच्या नुकसानाचा पिकविमा परतावा मिळवा:–काँग्रेस नेते सचिन होळकर यांनी दिले जिल्हाधिकारी यांना निवेदन
न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

न्यायभूमी
नाशिक दिनांक ०९ जानेवारी निशिकांत पानसरे
महाराष्ट्रात त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यात गेल्या वर्षी खरीप हंगामामध्ये शेवटच्या टप्प्यात अतिवृष्टी झाली होती या अतिवृष्टीमुळे काढणीला आलेले पिके पूर्णपणे उध्वस्त झाले होते.
जिल्ह्यातील मका,सोयाबीन इत्यादी प्रमुख पिकांचे जवळपास 80 ते 100 टक्के इतके नुकसान झालेले होते.अनेक शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिकविमा योजनेचा लाभ घेतलेला होता मात्र अद्यापपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये नुकसानीची रक्कम विमा कंपनीकडून देण्यात आलेली नाही.
सदरची बाब लक्षात घेता नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस तसेच कृषीतज्ञ सचिन आत्माराम होळकर यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. याप्रसंगी त्यांनी सदर विषयावर जिल्हाधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा करून त्यांना विषयाचे गांभीर्य समजून दिले.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सदर बाबीची दखल घेत विमा कंपन्यांना योग्य त्या सूचना देण्याची कार्यवाही सुरू केली.
खरीप हंगामातील नुकसानीमुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे अशा प्रसंगी शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून भरीव मदत मिळाली पाहिजे यासाठी होळकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आग्रह केला.
शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम वर्ग होईपर्यंत पाठपुरावा करण्यात येईल असे होळकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.