खान्देशी लीडर दिनदर्शिकेचे प्रकाशन पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या हस्ते संपन्न
न्यायभूमी संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर
न्यायभूमी
शिरपूर दि.०७ जानेवारी

येथील मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त ६ जानेवारी रोजी मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात आला.
या औचित्याने शिरपूर शहर पोलीस ठाण्यात साप्ताहिक खान्देशी लीडर वृत्तपत्राच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले.
बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी पहिले मराठी वृत्तपत्र प्रकाशित केले. त्या स्मरणार्थ दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.
या पार्श्वभूमीवर खान्देशी लीडर वृत्तपत्राच्या पहिल्यावहिल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमास सहायक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील,पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे, संदीप खैरनार,सुरेश सोनवणे आदी अधिकारी उपस्थित होते.
प्रकाशनप्रसंगी मानव विकास पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष खान्देशी लीडरचे संपादक वसीम हुमायून खाटिक.संपादक अखंड जम्बूद्वीप नरेश बापू गवळे,मानव विकास पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष पंडितराव निकम,दैनिक सकाळचे लोकप्रहरी प्रतिनिधी संपादक मोहसीन शेख,शेख टाइम्सचे संपादक इम्रान शेख,मानव विकास पत्रकार संघाचे शिरपूर शहर अध्यक्ष भटूदादा धनगर,सल्लागार एकनाथ वाघ तसेच पत्रकार रामसिंग राजपूत व ज्ञानेश्वर पावरा उपस्थित होते.



