Breaking
महाराष्ट्र

भरकटलेली तरुणाई व न समजलेले आईबाप : वसंत हंकारे यांचे व्याख्यान..

न्यायभूमी न्यूज विंचूर सुनील क्षीरसागर

0 9 0 0 0 1

न्यायभूमी  सुनील क्षिरसागर दि.६, विंचूर (नाशिक) :

जनता विद्यालय नांदुर्डी येथे प्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांचे व्याख्यान उत्साहात संपन्न झाले.

याप्रसंगी मराठा विद्या प्रसारक समाज संस्था उपसभापती देवराम मोगल, उपसभापती देवराम मोगल,स्कूल कमिटी अध्यक्ष रामदास बोराडे, उच्च स्कूल कमिटी अध्यक्ष एकनाथ निकम, अभिनव स्कूल कमिटी अध्यक्ष सिताराम ढोमसे, प्राचार्य म्हसकर बी डी,पर्यवेक्षिक रणशूर मॅडम, यांच्या उपस्थितीत सर्वप्रथम दीप प्रज्वलन व सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन आले.

ह्या प्रसंगी प्रा. वसंत हंकारे सर यांचा सत्कार म वि प्र उपसभापती डी बी मोगल यानी केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य म्हसकर बी डी यांनी केले.पाहुण्यांची ओळख ज्येष्ठ शिक्षक शिंदे टी जी यांनी करून दिली.

प्राध्यापक वसंत हंकारे यांनी आपल्या व्याख्यानात भरकटलेली तरुणाई व न समजलेला आईबाप समजून घेताना विद्यार्थ्यांना अनेक उदाहरणे देऊन आई आणि बाप यांचे महत्त्व पटवून दिले.

व्याख्यान देत असताना विद्यार्थी व पालक यांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या. आई बाप मुलांच्या संगोपनासाठी स्वतः उपाशी राहून मुलांना वाढवतात तेच मुले पुढे आईबापाचा आदर आणि सांभाळ करतात. मुलांनी समाजात कसं वागलं पाहिजे, वागताना आपल्या आई बापांना कसे समजून घेतले पाहिजे,.

याबद्दल सखोल मार्गदर्शन करून सर्व विद्यार्थी व पालक यांची मने जिंकून घेतली.

 याप्रसंगी पंचक्रोशीतील सर्व पालक व मान्यवर उपस्थित होते.या व्याख्यानासाठी डॉ संजय कुमार आहेर सर यांच्या विशेष प्रयत्नाने हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गांगुर्डे मॅडम व निकम सर यांनी केले.

 विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक शेंडे यु बी,सेवक सोसायटी संचालक जाधव डी जी,पवार व्ही के, कदम एन जे,शिंदे डी पी,गोतरने एन जे, संगमनेर एस आर,खापरे एस एल,शिंदे एस पी,शिंदे एस बी,हळदे एस बी,यांचे सहकार्य लाभले.

शब्दांकन व वृत्तांकन जाधव एस बी,काळे एम पी यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 0 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे