लासलगाव शहरातील अवैध धंद्यावर पोलिसांच्या धाडी सविस्तर वृत्त
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
लासलगाव दि ०१ मार्च
लासलगाव शहरातील अवैध धंद्यावर पोलिसांच्या धाडी पडल्या असून पोलिसांची कारवाई सुरु आहे.
अवैध गुटखा विक्री,जुगार व मटका बुकी अड्यावर लासलगाव पोलिसांनी धाड सत्र सुरू केले आहे.
शहरात अनेक ठिकाणी कारवाई सुरु आहे. या कारवाईत ८५८०/- रु चा मुद्देमाल जप्त करून,मटका बुकीस पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे.
पोलीस चौकशी व कारवाई सुरु आहे. लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांच्या नेतृत्वा पीएसआय अप्पासाहेब हंडाळ व पीएसआय पवन सुपनर यांची धडक कारवाईस सुरुवात झाली असून यामुळे अवैध धंदे करणाऱ्या माफियाचे धाबे दणाणले आहे.
मोठे मासे गळाला लागणार का ?
लासलगाव पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यावर छापा टाकणारे पीएसआय आप्पासाहेब हंडाळ यांचा धसका अवैध धंदे करणाऱ्यांनी घेतला आहे.
या कारवाईत काही बुकी राईटर यांना पकडण्यात आले असले तरी रेशनिंग तांदळाचा काळाबाजार करणारे, अवैद्य युरिया चा धंदा करणारे, वाळू, मुरूम माफीयांना पोलीस पकडणार का ?
यासह अन्य बाबींकडे लक्ष लागले आहे
खबरदार! अवैध धंदे सुरू ठेवाल तर…..
लासलगाव पोलीस ठाणे हद्दीतील गुटखा विक्री करणारे , बेकायदा गावठी दारू विक्री करणारे आणि मटका, जुगार अड्डा चालविणाऱ्यांनाची पोलिसांनी झाडाझडती घेतली.
पोलिस रेकॉर्डवरील गुटखा , जुगार आणि मटक्यासह विविध प्रकारचे अवैध धंदे चालविणाऱ्यांची पोलिसांनी झाडाझडती घेतली.
बेकायदा धंदे सुरू ठेवले, तर कोणाचीही गय केली जाणार नाही.
असा इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी दिला आहे.