महावितरण कंपनीच्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त विंचूर येथे निबंध व चित्रकला स्पर्धा
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
विंचूर (नाशिक) : विशेष प्रतिनिधी सुनील क्षिरसागर

गुरुवार दि.५ रोजी विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त लासलगाव उपकेंद्र विभागाच्या वतीने निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

या स्पर्धेसाठी विंचूर विद्यालयात साधारण ४५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.आणि पर्यावरण दिनानिमित्त शाळेत व विंचूर उपकेंद्र येथे वृक्षारोपण ही करण्यात आले.

या वर्धापन दिनानिमित्त राज्यभरात ०१ ते ०६ जून २०२५ दरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी विंचूर येथे किरण काकड (सहाय्यक अभियंता),नंदकुमार देवढे (क भा पा विद्यालयाचे प्राचार्य),दिव्या पवार (कनिष्ठ अभियंता),दिनेश सिंग राजपूत (सहाय्यक अभियंता),नितीन निकम (कनिष्ठ अभियंता), प्रदीप भालेराव (कनिष्ठ अभियंता),अरुण चोथमल (लिपिक लेखा),दिपाली देवरे (लिपिक लेखा)अवधूत मोरे (लिपिक मा.स.) वैभव दरेकर (बाह्य स्रोत तंत्रज्ञ),प्रवीण सपकाळ (शिपाई) व पत्रकार सुनील क्षिरसागर व रोहन सरोदे आणि स्पर्धक विद्यार्थी- विद्यार्थिनी,आदी उपस्थित होते.




