Breaking
महाराष्ट्र

घरातील इलेक्ट्रिक मोटार चालू करतांना शॉक लागून महिलेचा मृत्यू

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 8 9 9 9 4

न्यायभूमी न्यूज 

 विंचूर दि २६ जुलै अभय पाटील 

करंजगाव ता.निफाड येथील ३६ वर्षीय महिलेचा इलेक्ट्रिक मोटारीने घरात पाणी भरत असतांना शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला.

    याबाबत अधिक वृत्त असे की,दि.२४ जुलै रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास आसमा इकबाल तांबोळी,वय ३६ वर्ष रा.करंजगाव ह्या

घरातील पाणी भरणेसाठी इलेक्ट्रिक मोटार चालु करत असतांना शॉक लागल्याने बेशुद्ध पडल्या. त्यांना त्यांचे दीर आमीन तांबोळी यांनी

उपचारासाठी तातडीने निफाड येथील साई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये दाखल केले. मात्र डॉ.रोहित धोक्रट यांनी त्यांना मृत घोषित केले.

याबाबत सायखेडा पोलीस ठाण्यात रजि.नं. ४२/२०२५ भा.ना.सु.सं १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.

स.पो.नि.विकास ढोकरे यांचे मार्गदर्शनाखाली ए.एस.आय.कर्डक हे अधिक तपास करीत आहेत.

1/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 9 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे