Breaking
आरोग्य व शिक्षण

एस.एन.डी.स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे राष्ट्रीय विज्ञान दिन संपन्न

न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रेय दरेकर

0 8 9 9 8 5

न्यायभूमी 

येवला बाभुळगाव दि.०१ मार्च पुष्पा पाटील

 २८ फेब्रुवारी रोजी शाळेमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. भारताचे महान शास्त्रज्ञ सी.व्ही.रामन यांनी १९२८ साली ‘रामन परिणाम’ हा महत्त्वपूर्ण शोध लावला.

या शोधाच्या स्मरणार्थ दरवर्षी २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. विज्ञानाच्या माध्यमातून समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे हा या दिवसामागील प्रमुख उद्देश आहे.

कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य, उपप्राचार्य ,शिक्षक व मान्यवरांच्या हस्ते सी. व्ही.रामन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून झाली. विज्ञान दिनाचे महत्त्व स्पष्ट करताना प्राचार्य श्री निलेश शिंदे सर यांनी विद्यार्थ्यांना अंधश्रद्धा दूर ठेवून तर्कशुद्ध विचार करण्याचे आवाहन केले.

“विज्ञान हे केवळ विषय नसून जीवन जगण्याची पद्धत आहे,” असे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

यानिमित्ताने शाळेत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी सौरऊर्जा प्रकल्प,पावसाचे पाणी साठवण व्यवस्था, पर्यावरण संरक्षण, प्लास्टिकमुक्त भारत,जलशुद्धीकरण प्रक्रिया, रोबोटिक्स,स्मार्ट सिटी संकल्पना,कृषी तंत्रज्ञान आदी विषयांवर आकर्षक मॉडेल्स सादर केली.

विद्यार्थ्यांनी प्रत्येक प्रयोगामागील वैज्ञानिक तत्त्वे आत्मविश्वासाने समजावून सांगितली.

कार्यक्रमात विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा, पोस्टर सादरीकरण, विज्ञान विषयावरील वक्तृत्व स्पर्धा तसेच ‘दैनंदिन जीवनातील विज्ञान’ या विषयावर मार्गदर्शनपर प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले.

विज्ञान शिक्षक श्रीमती शेळके यांनी सोप्या प्रयोगांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विज्ञानातील गंमत आणि उपयुक्तता दाखवून दिली. रासायनिक अभिक्रिया,प्रकाशाचे परावर्तन, हवेचा दाब यांसारखे प्रयोग विद्यार्थ्यांच्या उत्सुकतेचा विषय ठरले.

 

Oplus_131072

तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारताची प्रगती,अवकाश संशोधन,डिजिटल क्रांती, आरोग्यसेवा क्षेत्रातील संशोधन यांविषयी माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी विज्ञान क्षेत्रात करिअर करण्याची प्रेरणा घेतली.

कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्य श्री.शिंदे सर,उपप्राचार्य श्री.पाटील सर श्री.बंड सर यांच्या हस्ते उत्कृष्ट मॉडेल्स, प्रयोग आणि स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. 

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विज्ञान विभागाच्या शिक्षिका शेळके मॅडम ,सोनवणे मॅडम,काळे मॅडम,साळुंखे सर तसेच सर्व शिक्षकवर्ग,विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या सहभागामुळे राष्ट्रीय विज्ञान दिनाचा कार्यक्रम यशस्वी व प्रेरणादायी ठरला.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन, संशोधनाची आवड आणि नवोन्मेषाची प्रेरणा अधिक दृढ झाली.

5/5 - (2 votes)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 8 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे