के.के.वाघ इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज काकासाहेबनगर येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
कोटमगाव दि ०६ जानेवारी
प्रतिनिधी ज्ञानेश्वर भवर
के के वाघ इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज काकासाहेब नगर, रानवड येथे वार्षिक स्नेहसंमेलन संस्कार-2024- 25 अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रस्ताविकातून के के वाघ इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य माननीय श्री शरद कदम यांनी आपल्या पाल्याच्या बाबतीत महाविद्यालयावर दाखवलेले विश्वासाबद्दल आभार व्यक्त करत विद्यार्थ्याला आधुनिकतेकडे नेण्यासाठी दिलेल्या सुविधांबद्दल के के वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री समीरजी वाघ तसेच समन्वयक डॉ. भूषण कर्डिले सर यांचे देखील धन्यवाद मानले.
शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक डॉक्टर भूषण कर्डिले सर यांनी विविध दाखले देत शैक्षणिक क्षेत्रातील वाटचाल नमूद करताना शहरात सुरू झालेल्या शाळा या शहरातच संपुष्टात येतांना दिसतात मात्र, आदरणीय काकासाहेब वाघ यांनी खेड्यात सुरू केलेली शैक्षणिक क्षेत्रातील ज्ञानगंगा ही संस्थेचे दिवंगत अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब वाघ उर्फ भाऊ यांनी शहरापर्यंत नेऊन पोहोचवली आणि आज त्याचा वटवृक्ष तयार होऊन हजारो विद्यार्थी ज्ञानाने समृद्ध होऊन बाहेर पडल्याचे नमूद केले.
या प्रसंगी उद्घाटक म्हणून नाशिक जिल्हा हवामान विश्लेषक मा. श्री दिपक जी जाधव हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी के.के. वाघ शिक्षण संस्थेचे जनसंपर्क अधिकारी मा. श्री अजिंक्य दादा वाघ यांनी वार्षिक स्नेहसंमेलनासाठी दिलेल्या उस्फूर्त प्रतिसादाबद्दल स्वागत व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा महाविद्यालय कायमच तत्पर असल्याचे विशद केले.
कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे मा. श्री दिपकजी जाधव यांनी आपल्या मनोगतातून बदलत्या हवामानाबरोबर पालक विद्यार्थ्यांनी देखील शिक्षण क्षेत्राशी निगडित आपले विचार हे बदलते ठेवले पाहिजे.
तसेच आपल्या पाल्याच्या विकासासाठी योग्य शैक्षणिक संकुलाची निवड का व कशी गरजेची आहे हे देखील नमूद केले.
सदर कार्यक्रमासाठी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक व के. के. वाघ शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य, मा. डॉ. भूषण कर्डिले सर, स्थानिक व्यवस्थापन समितीचे मा. श्री रमाकांत जाधव मा. श्री रामनाथ यांना पानगव्हाणे मा. श्री रघुनाथ दादा कोल्हे मा. श्री प्रमोद जी वाघ पंचक्रोशीतील विविध पदाधिकारी तसेच जवळपास 2500 पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. यशवंत पवार, शीतल वाघ व पुनम अष्टेकर यांनी केले, तसेच विद्यार्थ्यांमध्ये तनुजा कोल्हे, अदिती वाघ चेतश्री डागा,अनुष्का कापडी, जानव्ही चव्हाण, आदित्य देवरे यांनी सूत्रसंचालन केले.
प्रा. गणेश आवारे यांनी उपस्थिताचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.