लासलगाव महाविद्यालयाच्या रा.से.यो.च्या विशेष श्रमसंस्कार शिबिरात मॉडेल रिले/जंगली मॉडेल चे सादरीकरण
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
लासलगाव, दि २८ डिसेंबर अभय पाटील
लासलगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर नूतन विद्या प्रसारक मंडळ संस्थेचे जनरल सेक्रेटरी मा.गोविंदरावजी होळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद शाळा वाकी (खुर्द) या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे.
शिबिराच्या पाचव्या दिवशी रा.से.यो.स्वयंसेवकांनी महात्मा गांधी, जिजाऊ माता, तृतीयपंथी (लक्ष्मी), जंगली मॉडेल, साउथ इंडियन इ. थीमवर आधारित स्वयंसेवकांनी विविध साधनांच्या आधारे पाच मिनिटांच्या दिलेल्या निर्धारित वेळेत मॉडेल रिले/जंगली मॉडेल तयार केले.
मॉडेल रीले सादरीकरण करण्यासाठी क्रीडा संचालक डॉ.नारायण जाधव, प्रा.गणेश जाधव, प्रा.राम शिंदे, अंकुश व्हलगडे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
तसेच मॉडेल रीले चे परीक्षण करण्यासाठी रा.से.यो.कार्यक्रमाधिकारी डॉ.प्रदीप सोनवणे, डॉ.संजय शिंदे, प्रा.सुनिल गायकर, प्रा.देवेंद्र भांडे, प्रा.गुरुदेव गांगुर्डे, प्रा.गणेश जाधव, प्रा.राम शिंदे, अंकुश व्हलगडे सर, प्रा.अनिता चव्हाण, प्रा.दिपाली खांडेकर, प्रा.पुनम आहेर, प्रा.श्रद्धा गायकवाड तसेच रा.से.यो. स्वयंसेवक इत्यादी उपस्थित होते.