येवला येथील नायलॉन मांजाने महावितरण कंपनीचे अभियंता यांचा गळा कापला सविस्तर वृत्त
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
येवला दि ०३ जानेवारी:-
बंदी असलेल्या तसेच प्रशासनाकडून कारवाई सुरू असतानाही नायलॉन मांजाची विक्री सुरूच आहे त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांचा जीव धोक्यात आला असून गुरुवारी काल दिनांक 2 रोजी गुरूवारी महावितरणच्या अभियंत्याला नायलॉन मांजा ने जखमी केलेलें आहे.
गळा कापला जाऊन खोलवर जखम होत तब्बल 45 टाके पडलेले आहेत.
शहरात जीवघेणा नायलॉन मांजाची सर्रास विक्री होत असल्याने नागरिक जखमी होण्याच्या घटना वारंवार घडत आहे,गेल्या आठवड्यात एक पोलीस पाटील तसेच युवक जखमी झाला गुरुवारी सायंकाळी सुमारास नायलॉन मांजा मुळें
महावितरण कंपनीचे अभियंता योगेश अरुण रासने वय 40 यांचा गळा व हात कापलेला आहे.
त्यांच्यावर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांच्या जखमेवर 45 टाके टाकलें आहेत.
रासने हे सायंकाळी दुचाकीवरून शहरातून जात असताना त्यांच्या गळ्यात नायलॉन चा मांजा अडकला.
त्यांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न करीत असतानाच मांजा मुळें त्यांच्या गळ्यावर हातावर जखम झाली त्यांना तत्काळ उपचारासाठी शहरातील डॉ.राहुल चडालिया यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून
हा नायलॉन मांजा अनेकदा आजूबाजूच्या झाडावर घरावर किंवा वीजेचा पोलवर अडकलेला असतो.
अडकलेला मांजा सहजासहजी दिसून येत नसल्याने जा ये करणारे ना दुचाकीस्वारांना कधी जाळ्यात ओढेल ते सांगता येत नाही.
जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
यांची धास्ती असल्याने अनेक वाहनधारक बचाव करण्यासाठी गळ्याला रुमाल तसेच हेल्मेट घालून,मोपलर तसेच दुचाकीवर संरक्षण तार लावून प्रवास करीत आहे.
तरीही अशा घटना समोर येत असल्याने दुचाकी धारकामध्ये भिंतींचे वातावरण पसरले आहेत.