Breaking
गुन्हेगारी

पंचायत समिती अधिकारी लाचलूचपत पथकाच्या जाळ्यात

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 1 5 5 8 7

न्यायभूमी न्यूज 

नाशिक दि १० डिसेंबर मुख्य संपादक अभय पाटील 

पंचायत समिती नांदगाव येथील सहाय्यक प्रशासन अधिकारी प्रमोद रंगनाथ नवले (४६) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ८,००० रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवार, १० डिसेंबर २०२४ रोजी करण्यात आली.

तक्रारदार पुरूष (४६) यांच्या कार्यालयाची दप्तर तपासणी करणार असलेल्या नवले यांनी तपासणी अहवालात सवलत देण्यासाठी ३,००० रुपयांची लाच मागितली होती.

तसेच नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात सुरू असलेल्या निलंबित कर्मचारी प्रशांत जमदाडे यांच्या चौकशी प्रकरणात मदत करण्यासाठी ५,००० रुपये मागितले.

अशा प्रकारे एकूण ८,००० रुपयांची लाच मागणाऱ्या नवले यांना पैसे स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली.

नवले यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

नवले यांच्या ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या कारवाईची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक एकनाथ गं. पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पार पाडली.

पथकात पोहवा सुनील पवार, पोहवा संदीप वणवे, पोहवा योगेश साळवे यांचा समावेश होता.

या कारवाईचे मार्गदर्शन पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर आणि अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 5 5 8 7

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे