बांगला देशातील अल्पसंख्यांक हिंदूवरील अत्याचाराच्या निषेधार्थ लासलगांवी मुक मोर्चा
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
लासलगाव दि १० डिसेंबर विशेष प्रतिनिधी बाबासाहेब गिते
बांगला देशामधील अल्पसंख्याक हिंदू कुटुंबे,हिंदू महिला यांच्यावर इस्लामिक कट्टरवाद्यांनी अत्याचार सुरू केले आहेत. हिंदूं मंदिरांची तोडफोड व मूर्तींची विटंबना केली जात आहे.
तेथील हिंदू बांधवांवर होणारे अमानवी अत्याचार ही अत्यंत चिंतेची बाब आहे. याच पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाजाच्यावतीने आज मंगळवार, १० डिसेंबर रोजी लासलगांव येथे हिंदूंचा मूक मोर्चा निघाला होता. या मुक मोर्चाची सुरवात लासलगांव येथील प्रभु श्री राम मंदिरापासुन सुरवात होवुन लासलगांव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उप निरीक्षक भास्करराव शिंदे यांना निवेदन देवुन सांगता झाली.
हिंदू समाजाच्या वेदना सरकारला कळाव्यात यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने हा मुक मोर्चा काढण्यात आला होता. या निषेध मोर्चामध्ये सर्व समाजाच्या नागरीकांनी सहभाग नोंदविला होता. मुक मोर्चाच्या दरम्यान कोणताही अनुचीत प्रसंग घडु नये यासाठी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
लासलगांव येथील सर्व व्यापारी वर्गाने स्वयंस्फुर्तीने सकाळपासुन आपले व्यवसाय बंद ठेवले होते. रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट जाणवत होता. मुक मोर्चा संपल्यानंतर लासलगांव येथील सर्व व्यवसाय, दुकाने पुर्ववत सुरु झाले होते. मोर्चा दरम्यान कोणताही अनुचीत प्रसंग घडु नये यासाठी स.पो.उप.नि. भास्करराव शिंदे यांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता.
बांगला देशामध्ये हिंदू समाजावर कट्टरपंथीयांद्वारे अत्याचार होत आहेत. त्यांची मंदिरे, घरे, दुकाने जाळली जात आहेत. तेथील हिंदू महिलांवर अमानवीय अत्याचार होत आहेत. मुंडा, चकमा, कुकी, बौद्ध आदी आदिवासी व दलित हिंदू बांधवांना ईस्लामी कट्टरतावाद्यांनी जीवन जगणे मुश्किल केले आहे.
हे सर्व घडत असतांना बांगला देशाचे सरकारने हस्तक्षेप करणे गरजेचे होते, परंतु त्यांच्या कृतीतुन अत्याचारास मूकसंमती देत असल्याचे दिसुन येते.
मुक मोर्चामध्ये हिंदू सारा एक है, सारे विश्व का हिन्दु एक है, बटेंगे तो कटेंगे, हिंदुओ पर अत्याचार हमे रक्षा का अधिकार, एक है तो सेफ है, अशा घोषणा लिहीलेले फलक हाती घेवुन मुक मोर्चा संपन्न झाला.
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भास्करराव शिंदे यांना देण्यात आलेल्या निवेदनामध्ये,
बांग्लादेश मधील ५० जिल्हांमध्ये हिंदू समाजावर २००० हून अधिक जातीय हल्ले, हिंदूंचे घरे, दुकाने, मंदिरांवर करण्यात आलेले हल्ले, या हल्ल्यांमध्ये असंख्य हिंदू बांधवांची घरे आणि व्यवसाय जाळून, उध्वस्त करून अल्पसंख्याक हिंदू समाजाला रस्त्यावर आणण्यात आले आहे.
हिंदू महिलांवर अमावनीय अत्याचार करण्यात आलेले आहेत. याविरोधात बांगलादेश सरकारने कडक कारवाई करणे गरजेचे होते. तेथील लष्कराने या होणाऱ्या अत्याचाराला आळा घालणे गरजेचे असतांना तेही या क्रुर कार्यात सहभागी असल्याचे दिसुन आले आहे.
बांगलादेश च्या वतीने अल्पसंख्याक हिंदूंवर करण्यात येत असलेला हा अत्याचाराच्या विरोधात संन्यासी चिन्मय कृष्ण दास यांनी निषेध केला म्हणून त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला टाकून त्यांना अटक केली.
बांगलादेशाच्या या अमानवी कृत्यामुळे संपूर्ण जगभरातील मानवाधिकार संस्थांनी चिंता व्यक्त करून येणाऱ्या काळात हे थांबवण्यासाठी प्रयत्न नाही झाले तर संपूर्ण हिंदू समाजाचे बांग्लादेशातील अस्तित्व धोक्यात येईल अशी शक्यता वर्तवली आहे.
आज काढण्यात आलेल्या या मुक मोर्चाच्या माध्यमातुन आम्ही भारतीय राज्य शासनाला आमच्या भावना पोहचवत आहोत.
बांग्लादेश मध्ये अल्पसंख्याक हिंदू बांधवांवर होत असलेले अत्याचार थांबवण्यासाठी आंतर रराष्ट्रीय स्तरावर योग्य अशी भूमिका घेवून अल्पसंख्याक हिंदू हिताचे योग्य ते पाऊल उचलावे, असे नमुद आहे.