लासलगाव पोलीस ठाण्याच्या सतर्कतेमुळे कत्तलीच्या उद्देशाने नेण्यात येणारे सहा जनावरे जप्त…चालक फरार… २ लाख ६२ हजारांचा मुद्दे माल जप्त
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
लासलगाव दि १० डिसेंबर विशेष प्रतिनिधी
सोमवार (दिनांक ९ ) रोजीच्या रात्री १.४५ वाजेच्या सुमारास निफाड ते विंचुर रोडने एक इसम हा त्याचेकडील पिकअप गाडीमध्ये गोवंश जातीची जनावरे हि कत्तल करण्याचे उद्देशाने घेवून जाणार असल्याची गुप्त बातमी लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांना मिळाली.
त्यांनी लागलीच लासलगाव आणि विंचूर येथे रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पो.उ.नि. मारुती सुरासे, पो.शि.अविनाश साळुंके, शशिकांत निकम, सागर आरोटे, चंदू मांजरे आणि गोपनीय शाखेचे अंमलदार सुजय बारगळ यांना याबाबत माहिती देऊन नाका बंदी करून कारवाई करण्याचे आदेश दिले.
मिळालेल्या माहितीप्रमाणे पो.उ.नि.सुरासे यांचेसह वरील सर्व पोलीस स्टाफ विंचूर येथील पोलीस चौकीमध्ये एकत्र जमून निफाडकडून विंचूर रोडवर सापळा रचून थांबले.
सर्व स्टाफ रात्री २.३० वाजेच्या सुमारास हॉटेल आनंद समोर उभे असतांना त्यांना निफाड बाजूकडून विंचूरकडे जाणा-या रोडने एमएच ०४ जीआर ५३१६ या नंबरची एक पिकअप गाडी येतांना दिसली. त्या गाडीतील वाहन चालकास हात दाखवून गाडी रोडच्या कडेला थांबविण्यास सांगितले त्यावेळी संबंधीत चालकाने गाडी थोडी पुढे नेवुन थांबविली.
पोलीस गाडीकडे येत असल्याचे बघून सदर गाडीवरील चालक हा गाडीतून उतरुन निफाड बाजूकडे पळ जायला लागला. तेव्हा पो.शि.निकम, बारगळ यांनी त्याचा पाठलाग केला परंतु तो अंधाराचा फायदा घेवुन पळून जाण्यास यशस्वी झाला.
गाडीची झाडती घेतली असता त्यामध्ये गोवंश जातीच्या तीन जरशी व एक गावठी अश्या चार गायी, एक वासरी, दोन गोऱ्हे हे निर्दयीपणे, उपाशी पोटी त्यांना इजा होईल अशा पद्धतीने दोरीच्या साहाय्याने आखुडन बांधुन ठेवल्याचे दिसून आले.
यांनतर उपस्थित पोलीस यंत्रनेची खात्री झाली की सदरच्या वाहनावरील चालक हा वाहनामधील जनावरे हि कत्तल करण्याचे उद्देशाने घेवून जात आहेत. तेव्हा पो.उप. निरी. सुरासे यांनी पंचनामा करून सदरचे पिकअप वाहन जनावरासह लासलगाव पोलीस ठाण्यामध्ये जमा केले.
या वाहनामध्ये १) २०,०००/- रुपये कि.ची काळ्या रंगाची जरशी गाय, २) १०,०००/- रुपये कि. ची एक तांबड्या रंगाची जरशी गाय, ३) १०,०००/- कि. ची एक काळ्या रंगाची पोटावर पांढ-या रंगाचा पडा असलेली तसेच कपाळावर पांढरी ठिपका असलेली शिंगे नसलेली जरशी गाय, ४) १०,०००/- रुपये कि. एक पांढरा तांबूस रंगाची दोन शिंगे असलेली गावरान गाय, ५) ४,०००/- रुपये कि.चा एक काळ्या रंगाचा गोऱ्हा, ६) ५,०००/- रुपये किं.चा एक तांबड्या रंगाचा गो-हा, ७) ३,००० रुपये किं.ची एक काळ्या रंगाची वासरी आणि २,००,०००/- रुपये कि. ची एक महिन्द्रा कंपनीची सफेद रंगाची पिकअप गाडी क्रं. एमएच ०४ जिआर ५३१६ असा एकूण २,६२,०००/- मुद्देमाल जप्त करून अज्ञात चालकाविरुद्द गु.रजि. क्रमांक ३१३/२०२४ प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० ११(१), (अ)(ब), महाराष्ट्र पशु संरक्षण कायदा, १९७६ ५ अ(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून स.पो.नि.भास्कर शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली
पो.हवा.रामनाथ घुमरे अधिक तपास करीत आहेत.