Breaking
गुन्हेगारी

लासलगांव येथील फसवणुकीमुळे सर्वसामान्य जनतेच्या जीवनावर मोठा परिणाम

स्टार इन्स्पायर कंपनीच्या फसवणुकीबाबत जिल्हा ग्रामीण अधीक्षकांना काँग्रेस नेते सचिन होळकर यांनी दिले निवेदन

0 1 5 5 8 7

न्यायभूमी न्यूज

लासलगाव दि १५ ऑक्टोंबर

स्टार इन्स्पायर कंपनीच्या फसवणुकीबाबत जिल्हा ग्रामीण अधीक्षकांना काँग्रेस नेते सचिन होळकर यांनी दिले निवेदन देण्यात आले तसेच

_(मुख्यमंत्री, गृहमंत्री पालकमंत्री यांना देखील निवेदन पाठवले)_

 

नाशिक जिल्ह्यातील लासलगाव शहरांमध्ये गेल्या काही महिन्यांपूर्वी अल्पावधीत दामदुप्पट पैसे करून देणारी स्टार इन्स्पायर या कंपनीची एक शाखा सुरू होती.

लासलगाव परिसरात तसेच त्याच्या इतर शाखेच्या माध्यमातून संपूर्ण राज्य आणि राज्याबाहेरील हजारो गुंतवणूकदारांचे हजारो करोड रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याची शक्यता आहे.

या फसवणुकीमुळे सर्वसामान्य जनतेच्या जीवनावर मोठा परिणाम झाला आहे. अनेकांनी कर्ज काढून, घरदार, दाग-दागिने विकून या कंपनीकडे पैसे आणि सोने दिले होते मात्र त्यांचे पैसे डुबल्याने त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.

या सर्व प्रकरणाची पोलीस यंत्रणा तपास करीत आहे मात्र या प्रकरणाचा आवाका पाहता ही यंत्रणा कमी पडू शकते त्यामुळे या प्रकरणाचा तपास उच्चस्तरीय विभागाकडे सुपूर्द करण्यात यावा.

 त्याचप्रमाणे सदर गुन्हा आणि त्याची गंभीरता लक्षात घेऊन ही केस फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावी, सदर योजनेचा मुख्य सूत्रधार सतीश काळे याची नार्कोटेस्ट करून त्याचे इतर साथीदार, भागीदार यांची माहिती मिळवून त्यांच्यावर देखील कायदेशीर कडक कार्यवाही करण्यात यावी, सामान्य जनतेचे बुडालेले पैसे किमान मुद्दल तरी परत कसे देता येईल.

याबाबत विचार व्हायला हवा तसेच सदर फसवणुकीची सखोल चौकशी करावी यासाठी नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस सचिन आत्माराम होळकर यांनी नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

सदर निवेदनाची प्रत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री दादा भुसे यांना मेलद्वारे तसेच स्पीड पोस्टने पाठवले आहे.

लवकरच त्यांच्याशी याबाबत फोनवरून देखील संपर्क करण्यात येईल असे होळकर यांनी सांगितले. अनेकांची फसवणूक होऊन देखील तक्रार करण्यासाठी जनता पुढे येत नाही तसेच या प्रकरणाबद्दल समाजात मोठ्या प्रमाणात अफवा पसरवल्या जात आहे त्यामुळे या बाबींकडे प्रशासनाने, लोकप्रतिनिधींनी आणि जनतेने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

अधिकाधिक लोकांनी कायदेशीर तक्रार दाखल करावी तसेच कोणत्याही प्रकारच्या अफवेवर विश्वास ठेवू नये.

जिल्ह्यात या प्रकारच्या काही स्कीम सुरू असल्यास त्यांची देखील चौकशी करणे आवश्यक असल्याचे मत काँग्रेस नेते सचिन होळकर यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी सदर गुन्ह्याचा तपास लवकरात लवकर आणि पारदर्शकपणे पूर्ण केला जाईल असे आश्वासन होळकर यांना दिले.

3/5 - (2 votes)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 5 5 8 7

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे