सोयाबीनचे बाजारभाव पडण्यासाठी केंद्र सरकार जबाबदार:- काँग्रेस नेते,कृषीतज्ञ सचिन होळकर
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
लासलगाव दि १५ ऑक्टोंबर
सोयाबीन हे महाराष्ट्रातील एक प्रमुख पीक आहे. खरीप हंगामात, कमी कालावधीत शेतकऱ्यांना पैसा उपलब्ध करून देणारे पीक म्हणून या पिकाची शेतकरी मोठ्या प्रमाणात लागवड करतात. मात्र सध्या सोयाबीन पिकाचे दर हे मोठ्या प्रमाणात घसरले असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे सध्या मिळणारा बाजार भाव हा हमीभावापेक्षा देखील खूप कमी असल्याने शेतकऱ्यांना सरकारने रोख स्वरूपाची मदत करावी.
अशी मागणी नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस, कृषीतज्ञ सचिन होळकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. केंद्र सरकारने खाद्य तेलाची मोठ्या प्रमाणात आयात केली आहे याशिवाय कच्च्या तेलावरील आयात शुल्क देखील मोठ्या प्रमाणात कमी केल्यामुळे बाहेरील देशातून आपल्या देशात येणाऱ्या तेलाचे प्रमाण वाढले आहे.
नोव्हेंबर2022 ते ऑक्टोबर2023 या वर्षात 164 लाख टन खाद्यतेल केंद्र सरकारने आयात केले आहे.
केंद्र सरकार ते कच्च्या तेलावरची आयात शुल्क 30 टक्क्यांवरून 5.5 टक्के इतके कमी केले आहे या सर्वांचा एकत्रित परिणाम सोयाबीनच्या दरावर झाला आहे. यावर्षी पावसाच्या लहरीपणामुळे उत्पादनात अगोदरच घट आलेली आहे त्यामुळे सध्या उत्पादन खर्च निघणे देखील मुश्किल झाले आहे.
सोयाबीनला 4892 इतका हमीभाव असताना सध्या मात्र 3500ते4200 रुपये इतका बाजारभाव मिळत आहे बियाण्यांचे मशागतीचे वाढते दर, वाढती मजुरी, खते, औषधे यामुळे शेतकऱ्यांना हे पीक आता परवडणारे राहिले नाही.
त्यामुळे सरकारने सोयाबीन उत्पादकांना प्रतिक्विंटल 2000 रुपये इतकी मदत रोख स्वरूपात केली पाहिजे अशी मागणी कृषीतज्ञ तसेच काँग्रेस नेते सचिन आत्माराम होळकर यांनी व्यक्त केली..