Breaking
कृषीवार्ता

येवला तालुका सावधान चोरांचा मोर्चा आता वळला लाल कांद्यावर सविस्तर वृत्त

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 1 5 5 8 7

न्यायभूमी न्यूज 

येवला दि ०४ डिसेंबर प्रतिनिधी एकनाथ भालेराव 

लाल कांद्याचे दर वाढले असल्याने चोरट्यांनी आपला मोर्चा आता कांद्याकडे वळविला असून चोरट्यांनी काढणी केलेला सुमारे पाच क्विंटल कांद्याची चोरी केल्याची घटना येवला तालुक्यातील शिरसगाव लौकी येथे घडली.

या घटनेमुळे शेतकऱ्यास मोठा आर्थिक फटका बसला असून याप्रकरणी तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे.

 

उन्हाळ कांदा संपल्यानंतर आता शेतकऱ्यांनी अनेक संकटातून वाचवलेल्या लाल कांद्याची काढणी सुरू आहे तसेच लाल कांद्याला चांगली मागणी आहे. सध्या लाल कांद्याचे दर हे तेजीत असून ३००० हजारांपासून ५ हजार रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. त्याचाच फायदा घेत चोरट्यांनी आता

 

शेतकऱ्यांच्या शेतात काढून ठेवलेल्या कांद्यावर डल्ला मारायला सुरुवात केली आहे. येवला तालुक्यातील शिरसगाव लौकी येथील सुभाष उत्तम पाटील यांच्या गट नंबर ४६ मधील शेतात विक्रीसाठी काढणी करून ठेवलेल्या कांद्यापैकी अंदाजे ५ क्विंटल कांद्याची चोरी झाली आहे.

 सध्या कांद्याचे दर हे ३ ते ५ हजार रुपये प्रतिक्विंटल असून एकूण ३० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती शेतकरी सुभाष पाटील यांनी दिली आहे.

 

खते, औषधे मारून अतिवृष्टीतून वाचवलेल्या कांद्यातून चार पैसे पडण्याच्या अगोदरच शेतकऱ्यांच्या लाल कांद्यावर चोरट्यांनी डल्ला मारल्याने शेतकऱ्याला मात्र आर्थिक फटका बसला आहे.

ग्रामीण भागात आधीपासूनच होताहेत चोऱ्या

ग्रामीण भागात भुरट्या सातत्याने होणाऱ्या चोऱ्यामुळे आगोदरच शेतकऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना झालेली आहे. यापूर्वी शेत शिवारातील सौर पॅनल, इलेक्ट्रीक मोटारी, पीव्हीसी पाईप, कॅरेट अशा वस्तूंची चोरी झालेली आहे.

■ चोरट्यांनी यापूर्वी देखील कांदा पळविला आहे. आता पुन्हा शेतकऱ्यांची नजर लाल कांद्याकडे वळली असून कांदा पीक ही सुरक्षित राहिले नसल्याची स्थानिक शेतकऱ्यांची भावना झाली आहे.

1/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 5 5 8 7

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे