Breaking
क्रिडा व मनोरंजन

राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धा नाशिकमध्ये उत्साहात संपन्न

प्रथम क्रमांक सिंधुदुर्ग,उपविजेता पालघर,तृतीय क्रमांक धाराशिव

0 1 5 5 8 7

न्यायभूमी न्यूज 

  नाशिक दि ०४ डिसेंबर

४ थी 19 वर्षाखालील राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा दिनांक :- २८-११-२०२४ ते ०१-१२-२०२४ या कालावधीत एम. सी. सी. क्रीडागंण, म्हसरूळ, नाशिक शहर या ठिकाणी टेनिस क्रीकेट असोसिएशन महाराष्ट्र व टेनिस क्रीकेट असोसिएशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.

सदर स्पर्धेत मुलांच्या गटात एकूण 30 संघानी सहभाग नोंदवला होता.

सदर स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी आर.टी.ओ अधिकारी, श्री. पाटील आर. टी. ओ. अधिकारी, नाशिक शहर, श्री. राजेंद्र आहेर मानव अधिकार नाशिक श्री उत्तमराव कडलक भारत नगर जेष्ठ नागरीक संघ, अध्यक्ष नाशिक अखिल भारतीय टेमिस क्रीकेट असोसिएशन व टेनिस क्रीकेट असोसिएशन महाराष्ट्र सचिव सौ. मिनाक्षी गीरी, टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र उपाध्यक्ष, विलास गिरी, महिला विभाग महाराष्ट्र अध्यक्ष धनश्री गीरी, श्री. विजय बिरासदार सांगली जिल्हा, बनेमुजीब शेख, (परभणी), शफी शेख (संभाजीनगर) श्री महेश मिश्रा ठाणे जिल्हा ,सहसचिव श्री. यश चव्हाण (पालघर जिल्हा) श्री. सिध्देश गुरव (रत्नागिरी) श्री. कुणाल हळदणकर (सिंधुदुर्ग जिल्हा) श्री गोवर्धण राठोड (बुलढाणा जिल्हा) श्री घनस्याम सानप (अहिल्यानगर जिल्हा), श्री. इंद्रजीत वाले (धाराशीव) श्री संदीप पाटील मुबंई उपनगर जिल्हा, विलास गायकवाड (नाशिक जिल्हा) सदर प्रसंगी उपस्थित होते

राज्यस्तरीय स्पर्धेचा अंतिम सामना सिधुदुर्ग विरुद्ध पालघर जिल्हा यांच्या झाला सिधुदुर्ग संघाने चांगला खेळ करत संघाला विजयश्री मिळून दिला.

जिल्हा पालघर संघाने चांगले प्रयत्न करून या अंतिम सामन्यात चांगली चुरस निर्माण करून उपविजेता ठरला.

तसेच धाराशिव संघाला तिसरा क्रमांक, चौथा क्रमांक रत्नागिरी मिळाला तसेच मुलीमध्ये संघामध्ये अंतिम सामना अहिल्यादेवीनगर विरुद्ध नाशिक होऊन अहिल्यादेवीनगर नी उत्कृष्ट खेळ करत संघाला विजयश्री मिळवून दिला.

उप विजयी नाशिक जिल्हा, तिसरा क्रमांक धाराशिव ,चौथा क्रमांक सांगली ,मॅन ऑफ दी सीरीज- जतिन मेहेर याला मिळाली.

या पंच म्हणून ज्यांनी काम पाहिले विजय उमरे ( पंच मंडळ चेअरमन), लखन देमामुख, (धाराशीव) ओमकार पवार (नाशिक), श्रीनाथ कारकर, आर्जून वाघमारे (परभणी) भूषण गावकर (सिंधुदुर्ग) प्रथमेश जाणस्कर (रत्नागिरी) मानस पाटील (मुंबई उपनगर) दर्शन थोरात (नाशिक) धनजय लोखंडे (नाशिक समालोचक) सुनिल मौर्य (रत्नागिरी समालोचक) धनश्री गीरी (नाशिक) रोहिणी सकटे रूतुजा तोरडमल सांगली, रिमा शेडगे ठाणे यानी पंचाची भुमिका पार पाडली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 5 5 8 7

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे