न्यायभूमी न्यूज
सिन्नर दि २६ नोव्हेंबर
प्रतिनिधी:- डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी यश कैलास वाघ याने जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले असून त्याची धुळे येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
महाराष्ट्र शासन जिल्हा क्रीडा अधिकारी नाशिक यांच्या वतीने नाशिक या ठिकाणी कराटे स्पर्धा संपन्न झाली.
यश याने सतरा वर्षाखाली व ८२ किलो वजन गटात मुलांच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला.
त्याला क्रीडा शिक्षक शिवाजी गुरुळे यांचे मार्गदर्शन लाभले . त्याच्या यशाबद्दल मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस एडवोकेट नितीन ठाकरे, तालुका संचालक कृष्णाजी भगत संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉ. भास्कर ढोके ,शालेय समितीचे अध्यक्ष नारायणशेठ वाजे, उच्च माध्यमिक समितीचे अध्यक्ष विठ्ठलतात्या वामने ,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सोमनाथ वारुंगसे, विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास वाजे आदींसह शालेय समिती सदस्य,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले आहे.
त्याचे व मार्गदर्शक शिक्षक यांचा विद्यालयाच्या वतीने विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास वाजे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी दिगंबर जाधव , पी.आर. करपे, सोमनाथ गिरी आदींसह कर्मचारी उपस्थित होते.