विंचूर महाविद्यालयात शिक्षक – पालक संघ मेळावा संपन्न*
न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील, मुख्यसंपादक दत्तात्रय दरेकर
न्यायभूमी न्यूज /दत्तात्रय दरेकर
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आज शनिवार दिनांक 14.12.2024 रोजी शिक्षक – पालक संघाचा मेळावा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील व रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन केले गेले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले गेले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य देवढे एन. ई. यांची निवड करण्यात आली. त्यानंतर वाघमारे टी .आर. यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले.
या मेळाव्यासाठी शेकडोच्या संख्येने पालक उपस्थित होते. पालकांसमोर प्रथम सत्र परीक्षेचा निकाल सादर केला गेला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची पालकांना ओळख करून दिली गेली. पालकांमधून राजाभाऊ गोरे, नानाभाऊ गाडे, सोमनाथ निकम मालतीताई जाधव, जोशी मॅडम, नेवगे ताई यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
तर ज्यूनिअर कॉलेज विभागप्रमुख टिळेकर आर. टी. व निकम एस. व्ही. यांनी शिक्षक मनोगत व प्राचार्य देवढे एन. ई . यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमास माता पालकही बहुसंख्येने उपस्थित होत्या. तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायकवाड एस. पी. यांनी केले. तर आभार प्रदर्शन दळवी डी. व्ही. यांनी केले.