शारदीय नवरात्रौत्सवाट रंगला होम मिनिस्टर चा रंगतदार खेळ
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
विंचूर दि १० ऑक्टोंबर दत्तात्रय दरेकर
येवला – विंचूर विधानसभा मतदारसंघातील लाडक्या भगिनींसाठी नवरात्र उत्सव निमित्त भव्य पैठणी स्पर्धा बाजार गल्ली येथे संपन्न झाली.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम प्रियदर्शनी इंदलकर आणि त्याचबरोबर सुपर होम मिनिस्टर टीव्ही शो चे सूत्रसंचालक कॉमेडी निवेदक बिभीषण गदादे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते.
या वेळेस कॉमेडी निवेदक बिबीषन गदादे यांनी आपल्या खास विनोदी शैलीत उपस्थित महिलांना व नागरिकांना खूप खळखळून हसविले विंचूर येथील सर्व महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला.
यावेळेस विविध स्पर्धेचे खेळ घेण्यात आले व उपस्थित महिलांना बक्षीसे वाटण्यात करण्यात आली विनर स्पर्धकांना पैठण्या देण्यात आल्या या कार्यक्रमाचे सौजन्य भवानी पेठ प्रतिष्ठान व नवदुर्गा मित्र मंडळ यांच्यातर्फे करण्यात आले होते.
मंडळातील सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते.