Breaking
आरोग्य व शिक्षण

डुबेरे विद्यालयात आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 1 5 5 8 7

न्यायभूमी न्यूज 

सिन्नर दि १७ डिसेंबर प्रतिनिधी:-

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम ग्रामीण रुग्णालय दोडी बुद्रुक यांच्यावतीने डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी संपन्न झाली.

तपासणी करताना आजार आढळलेल्या विद्यार्थ्यांना पुढील तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय सिन्नर व दोडी या ठिकाणी पुन्हा तपासणीसाठी बोलावण्यात आले .

           तसेच इयत्ता नववी ते बारावी पर्यंतच्या मुलींना मासिक पाळीविषयी मार्गदर्शन करण्यात आले. मासिक पाळीच्या काळात घ्यावयाची स्वच्छता व काळजी तसेच या काळात घ्यावयाचा सकस आहार या विषयी मार्गदर्शन करण्यात आले.  

         विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास वाजे यांनी प्रास्ताविक करून उपस्थित डॉक्टर व सेवकांचा सत्कार व स्वागत केले.

सूत्रसंचालन पी. आर.करपे यांनी तर आभार सोमनाथ गिरी यांनी मानले.

           दोडी ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्य अधिकारी डॉ. सरिता भालेराव, औषधनिर्मिती पल्लवी धुसे व पूनम पाचोरे यांनी विद्यार्थ्यांची तपासणी करून मार्गदर्शन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 5 5 8 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे