प पु श्री मयंकराज बाबा यांची नाशिक जिल्हा महानुभाव परिषदेच्या अध्यक्षपदी निवड
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
विंचूर (नाशिक) : दि १८ डिसेंबर दत्तात्रय दरेकर
नाशिक जिल्हा महानुभाव परिषदेची दि. १५ डिसेंबर रोजी श्रीकृष्ण मंदिर शिंदे पळसे (नाशिक) येथे मिटिंग आयोजित करण्यात आली होती.
त्या मिटिंग मध्ये साधक बाधक चर्चा झाली, आणि नाशिक जिल्हा महानुभाव परिषद अध्यक्ष आणि पदाधिकारी बदलण्यात यावा, असे महंत वाल्हेराज बाबा पातुरकर यांनी सुचवले, त्यानंतर जिल्हा निवासी संत, महंत तसेच पदाधिकारी, सदस्य यांच्या सर्वानुमते नाशिक जिल्हा महानुभाव परिषदेच्या अध्यक्षपदी प पु प म श्री मयंकराज बाबा पंजाबी, श्री द्वारकाधीश सेवा संस्था, श्रीकृष्ण मंदिर, महानुभाव आश्रम, भरवस ता. निफाड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
त्यावेळी प पु प म श्री कृष्णराज बाबा मराठे, प पु प म श्री वाल्हेराज बाबा पातुरकर, प पु प म श्री कृष्णराज बाबा पंजाबी, प पु प म श्री कृष्णोबास बाबा कपाटे, प पु प म श्री सायराज बाबा लोणारकर, प पु प म श्री वाल्हेराज बाबा गुंफेकर, प पु प म श्री मालोव्यास बाबा लासुरकर, प पु प म श्री दत्तराज बाबा पालिमकर, प पु प म श्री अक्षयराज कपाटे, पु प म श्री आळजपूरकर बाबा,आणि जिल्हा निवासी अनेक संत महंत उपस्थित होते.
मयंकराज बाबाजी महानुभाव या पदावर निवड झाल्या बद्दल नाशिक जिल्ह्यासह निफाड तालुक्यातील महानुभाव संस्थांवर आनंद व्यक्त करत बाबांचा सत्कार करण्यात येत आहे.