तुमचे पैसे झाले का डबल मुद्दल तरी आली का ? कोट्यवधींचा गंडा! सविस्तर वृत्त
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
लासलगाव दि ०६ ऑक्टोंबर
सविस्तर वृत्त असे आहे की,गेल्या आठ दिवसापासून कंपनीचा मास्टर माईंड सतीश काळे (सर) अचानक गायब झाला आर्थिक घेवाण चालू होती परंतु देवाण बंद झाली मास्टर माइंड्सचा मोबाईल बंद असल्याने कोणाचाही त्याच्याशी संपर्क होत नव्हता.
कंपनीची मॅनेजर असलेली मॅडम गुंतवणूकदारांना रोज वेगवेगळे खोटे कारण सांगत होती.
अचानक समाज माध्यमांवर एक ऑडिओ क्लिप वायरल झाली आणि गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले.
लासलगाव मधे दुप्पट पैशाच्या अमीषाने, स्वस्तात प्लॉट आमिषाने हजारो मध्यमवर्गीय गरीब लोकांना करोडोंचा गंडा घालून त्यांना कंगाल केल्याची घटना सात वर्षांपूर्वी सतीश काळे यांचे कडूनच घडलेली असून,त्याच गोरगरीब जनतेची फसवणूक करणाऱ्या भामट्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत लासलगाव सह महाराष्ट्रभर तब्बल 5 हजाराहून अधिक नागरिकांची कोटयवधींची माया डबल करण्याच्या हेतूने आमिष दाखवून गोळा करून कंपनी कुलप बंद करून पसार झाल्याची चर्चा लासलगाव परिसरात सुरू आहे.
दाम दुपटीच्या आशेने लोक पैसे गुंतवतात.
परंतु या साखळीचा शेवट काय शेवटी गुंतवणूकदारांची फसवणूक १००% होतेच असे असूनही या कंपनीने फसवणूक केलेल्या लोकांच्या रकमेचा हा आकडा ३०००कोटींच्या घरात असण्याची शक्यता आहे.
स्वस्तात सोने, दोन महिन्यात दाम दुप्पट या शेअर मार्केट ट्रेडिंग अशा युक्त्यांचा वापर करून हा हायटेक गंडा घालण्यात आला आहे.
ही कंपनी सुरुवातीला 5000 रुपयांच्या बदल्यात एका महिन्यात 10 हजार रुपये देत होती. लोकांची हाव वाढत गेली.
चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं पाहुन कंपनीने 30 दिवसात 1 लाखावर 2 लाख परतीची योजना काढल्यावर अनेकजण तुटुन पडले.
अनेकांनी दागिने गहाण ठेवून पैसे गुंतवले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे .
अजब म्हणजे फसवणुक होत असलेल्या अनेक लोकांना ही बोगस कंपनी आहे, एक ना एक दिवस बंद पडेल हे चांगले माहिती आहे.
पण सुरुवातीला हमखास मोबदला मिळाल्याने जितके दिवस दामदुप्पट मोबदला घेता येईल अशा प्रयत्नात हे गुंतवणुकदार होते.
आपल्याला पैसे मिळतात म्हणून मित्रांना आणि नातेवाईकांना मिळवून देण्यासाठी अनेकांनी आग्रह करून गुंतवणूक करण्यास भाग पाडले आहे.
वर्क फॉर होम नावाने बेरोजगार तरुणांची भरती करून पगार व इन्सेटिव्ह आमिषाने अनेक भोळ्या भाबड्या बेरोजगार तरुणांना सहभागी करून घेऊन ग्राहक आणल्यावर मोठे कमिशन देऊन मासिक पगार सुरु केल्यानंतर जास्तीत जास्त गुंतवणुकदारांना सहभागी करुन घेण्याची चढाओढ या पंचक्रोशीत सुरु झाली आहे.
गेल्या आठ महिन्यात या स्किम मध्ये निफाड तालुक्यात हजारो लोकांनी आपले पैसे गुंतवल्याचे माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
या कंपनीने महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी शाखा स्थापन केलेल्या असून अचानक या सर्व शाखा बंद पडल्याने गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे.
अजून पर्यंत तरी कुठल्याही गुंतवणूकदाराने पोलीस तक्रार केली नसल्याचे समजते. जर तक्रार दाखल केली तर पैसे मिळाले नाही तर अनेक प्रश्न लोकांसमोर पडलेले आहेत.
न्यायभूमी न्यूज नागरिकांना आवाहन करते की, थोड्या दिवसात दाम दुप्पटच्या आमिषाला बळी न पडता आपली आयुष्याची जमा पुंजी राष्ट्रीयकृत बँका,आर बी आय ने मान्यता दिलेला आर्थिक संस्था मध्ये गुंतवणूक करावी.
कारण आर्थिक फसवणूक करणारी चीट फंड करणारे संचालक व साथीदार एजंट यांच्यावर गुन्हा जरी दाखल केला तरी त्यांच्याकडून पूर्ण रक्कम मिळेल अशी शक्यता फ़ारच कमी असते.
न्यायालयीन प्रक्रिया खूप हाळू चालते तारीख पे तारीख असते. त्यामुळे अश्या फसवणूक करणाऱ्यांना आजिबात धाक राहिलेला नाही.
यावर राज्य आणि केंद्र सरकारने गंभीरपणे दखल घेतली पाहिजे.
म्हणूनच जिथे लालच जास्त तिथे धोका हे वाक्य नेहमी लक्षात ठेवून आपल्या बचतीची गुंतवणूक योग्य ठिकाणी करणे यातच शहाणपण आहे.
मास्टर माईंड अचानक गायब झाल्यानंतर च्या आठ दिवसाचे कलेक्शन कोणी गडप केलें आहे, याचीही चर्चा लासलगावात सुरू आहे.