Breaking
आरोग्य व शिक्षण

ओझर येथील बोरस्ते विद्यालयात ‘गांधी फाउंडेशन’ परीक्षा संपन्न…

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 9 0 0 0 1

न्यायभूमी न्यूज

रानवड दि ०७ ऑक्टोंबर प्रतिनिधी:- मीनाताई शेटे 

ओझर येथील ‘मविप्र’ संचलित माधवराव बोरस्ते विद्यालयात ‘गांधी फाउंडेशन’ जळगाव तर्फे आयोजित गांधी विचारधारा संस्कार स्पर्धा परीक्षा संपन्न झाल्या.

या परीक्षेस विद्यालयाचे पाचवी ते दहावीचे १८४ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. विद्यार्थ्यांना समिती प्रमुख राजेंद्र शिंदे, राजश्री टरले यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी परीक्षा केंद्रास भेट दिली.

सदर परीक्षा सुरळीत वातावरणात पार पडली. त्यानिमित्त समिती प्रमुख राजेंद्र शिंदे यांनी मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

5/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 0 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे