लासलगाव महाविद्यालयात रक्तदान शिबिर व हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
लासलगाव दि २३ ऑगस्ट निशिकांत पानसरे
लासलगाव येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर यांच्या रौप्य महोत्सवी कारकिर्दीनिमित्त राष्ट्रीय सेवा योजना व +२ स्तर, राष्ट्रीय छात्र सेना आणि माजी विद्यार्थी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात एकूण ४३ रक्तदात्यांनी रक्तदान करून शिबिर यशस्वी केले. याप्रसंगी संस्थेच्या इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थिनी आणि महाविद्यालयातील सर्व विद्यार्थिनींची मोफत हिमोग्लोबिन तपासणी देखील करण्यात आली.
तसेच याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण देखील करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे उपस्थित होते तसेच संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर, श्री.हसमुखभाई पटेल, अॅड.संदीप होळकर, श्री.सचिन मालपाणी, उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे, डॉ.सोमनाथ आरोटे, पर्यवेक्षक श्री.उज्वल शेलार, जनकल्याण रक्तपेढी नाशिक चे डाॅक्टर व त्यांची संपूर्ण टिम, निमगाव वाकडा आरोग्य केंद्राचे डॉ.प्रशांत राठोड व त्यांची टीम, रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी डॉ.प्रदीप सोनवणे, डॉ.उज्वला शेळके, डॉ.संजय शिंदे, प्रा.मारुती कंधारे, प्रा.देवेंद्र भांडे, प्रा.सुनिल गायकर, लेफ्टनंट बापू शेळके, इत्यादी उपस्थित होते. यावेळी प्रा.मारुती कंधारे यांनी सूत्रसंचालन केले तर श्री.उज्वल शेलार यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित केले आणि प्रा.सुनिल गायकर यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी व सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.